वरळी स्पा सेंटर हत्याकांडात मोठं ट्विस्ट आले समोर…
मुंबई : वरळीत स्पामध्ये गुरु वाघमारे उर्फ सिधप्पा वाघमारे याची हत्या करण्यात आली होती. गुरु वाघमारे याच्या हत्येत त्याच्याच प्रेयसीचा हात असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत त्याच्या प्रेयसीसह पाच जणांना अटक केली आहे.
सिधप्पा वाघमारे हा आपली प्रेयसी मेरी जोसेफसोबत वरळीतील एका स्पामध्ये 23 जुलैच्या रात्री होता. याचवेळी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिस तपास करत असताना त्याच्या हत्येमध्ये त्याची प्रेयसी मेरी जोसेफ हिचा हात असल्याचे समोर आले आहे. मेरी जोसेफसोबतच पोलिसांनी या प्रकरणात या स्पाचा मॅनेजर शमशाद अंसारी याला देखील अटक केली आहे, हल्ल्यापूर्वी सीसीटीव्ही बंद केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरी जोसेफचा देखील या हत्याप्रकरणात सहभाग आहे. 23 जुलै रोजी जेव्हा आरोपी मोहम्मद फिरोज अंसारी आणि साकिब अंसारी यांनी स्पामध्ये घुसून सिधप्पा वाघमारे याची हत्या केली. गुरु वाघमारे याची प्रेयसी मेरी जोसेफ हिने देखील त्यांना मदत केली. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेला स्पाचा मालक संतोष शेरेकर याला देखील तिनेच सकाळी फोन करून काम झाल्याचे सांगितले. या स्पाचा मॅनेजर असलेला शमशाद अंसारी उर्फ सूरज हा वाघमेरेच्या हत्येच्या पूर्वी काही वेळ आधीच आपल्या दोन स्टाफसोबत स्पाच्या बाहेर पडला होता. मात्र जाताना त्याने सीसीटीव्ही बंद केल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे. त्याला देखील अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसकाका Video News: २७ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
स्पामध्ये मैत्रिणीसमोरच हत्या; मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली होती नावे…
प्रेम! हात, पाय, स्तन कापून आणि गुप्तांगावर वार अन् निर्घृण हत्या…
ऑनर किलिंग! अमितच्या ओरड्याचा हृदय पिळवटून टाकणारा आवाज; पाहा Video…
सेवानिवृत्त शिक्षकाने अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीचे केले ५७ तुकडे…