यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…

मुंबई : उरणच्या यशश्री शिंदे (वय २०) हिचा शवविच्छेदन अहवाल हाती आला आहे. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रथमदर्शनी हा खून एकट्यानेच केला असावा, असे दिसत आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

यशश्री शिंदे हिच्या हत्याकांडानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे ही गुरुवारी मित्राच्या घरी जाते म्हणून घराबाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर धक्कादायक अवस्थेत एक मृतदेह आढळला. हा मृतदेह यशश्री शिंदे हिचा असल्याचे उघड झाले. शवविच्छेदन करतेवेळी पीडितेची अवस्था पाहून डॉक्टरही हादरले होते. यशश्रीच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे.

शवविच्छेदन अहवालात बलात्कार झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रथम दर्शनी हा खून एकट्यानेच केला असावा असे दिसत आहे. 2019 मध्ये याच संशयित आरोपीवर या मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. जवळपास 6 महिने तो तुरुंगात होता. त्यानंतर तो बाहेर आल्यावर पुन्हा त्याने हिच्यासोबत जवळीक केली होती. नवी मुंबईतील उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितले की, मृत यशश्री शिंदे वाणिज्य शाखेची पदवीधर असून, तिने एका खासगी कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत होती. गुरुवारी सकाळी ती तिच्या मित्राच्या घरी जात असल्याचे पालकांना सांगून घरातून बाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी रात्री उरण पोलिस ठाण्यातील तपास शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याला कोटनाका येथील रस्त्यावर एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली असून भटके कुत्रे तिथे फिरत असल्याची माहिती दिली. प्राण्यांनी चावा घेतल्याने मुलीचा चेहरा विद्रूप झाल्याचे पोलिस पथकाला आढळून आले, तसेच तिच्या खांद्यावरचे मांसही खाल्ले होते. कमरेला आणि पाठीवर चाकूच्या तीन जखमा होत्या. बेवारस मृतदेह मिळाल्यानंतर यशश्री शिंदेच्या पालकांना बोलवण्यात आले. त्यांनी तिच्या कपड्यांवरून आणि कमरेवरील टॅटूवरून तिची ओळख पटवली. त्याचवेळी पीडित मुलीच्या पालकांनी दाऊद शेख नावाच्या संशयिताचे नाव सांगितले होते.’

यशश्रीची हत्या केल्यानंतर तिच्या शरिरावर ज्या जखमा होत्या त्या काही प्राण्यांनी तिच्या शरिराचे लचके तोडल्याचं दिसून आले आहे, असेही पोलिस उपायुक्तांनी सांगितले आहे. पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले आहेत, त्याला कोणत्याही क्षणी ताब्यात घेतले जाईल. चार टीम रवाना झाल्या आहेत, असे विवेक पानसरे यांनी सांगितले.

दरम्यान, व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या दाऊद शेख याने 2018 मध्ये 14 वर्षीय यशश्री शिंदे हिला टार्गेट केले होते. तिला गोडगोड बोलून आपल्या जाळ्यात ओढले. 2019 मध्ये त्याने यशश्रीचे शारीरिक शोषण केले. कुटुंबीयांनी दाऊदविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दाऊदला तुरुंगात पाठवले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दाऊदने पुन्हा यशश्रीशी संपर्क साधून तिचा पाठलाग सुरू केला होता.

पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…

प्रेम! हात, पाय, स्तन कापून आणि गुप्तांगावर वार अन् निर्घृण हत्या…

पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…

वरळी स्पा सेंटर हत्याकांडात मोठं ट्विस्ट आले समोर…

नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…

‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!