
प्रसिद्ध अभिनेत्याला केली अटक; मानवी तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश…
मुंबई : वेब सिरीज आणि आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने 60 जणांची फसवणूक केली असून त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मोठ्या मानवी तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. मनीष ग्रे उर्फ मॅडी असे त्याचे नाव असून, त्याला या टोळीचा मुख्य सूत्रधार (किंगपिन) म्हणून अटक करण्यात आली आहे.
मानवी तस्करी प्रकरणात अभिनेता मनीष ग्रेब याला त्याच्या वडाळा येथील घरातून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबरच त्याच्या 4 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक चीनी नागरिक आहे. तैसन उर्फ आदित्य रवी चंद्रन, रूपनारायण गुप्ता, जेन्सी राणी, तलानीती नुलाक्सी (चिनी नागरिक, कझाकस्तान वंश) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या रॅकेटने तब्बल 60 युवकांना बनावट नोकरीच्या आमिषाने फसवून म्यानमारमध्ये पाठवले होते. या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली असून ते आता मुंबईकडे परत येत आहेत.
मनीष ग्रे उर्फ मॅडी आणि त्याच्या टोळीने सोशल मीडियावरून संपर्क साधून थायलंडमध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दिले. त्यानंतर या तरुणांना बेकायदेशीररित्या बोटीने म्यानमारच्या मियावाडी भागात नेण्यात आले. तिथे सायबर फसवणुकीत भाग घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यांच्याकडून खंडणी, डिजिटल फ्रॉड यांसारख्या गुन्ह्यांचे काम करून घेतले जात होते.
सुटलेल्यांपैकी एका पीडिताने सांगितलं की, एजंटांनी त्यांचे पासपोर्ट काढून घेतले आणि मारहाण केली. जर ते नियम पाळले नाहीत तर अवयव काढून टाकण्याची धमकी दिली. त्यांना DBL नावाच्या एका चीनी कंपनीत काम करत असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात ते AK-47 रायफलधारी बंडखोरांच्या ताब्यात होते. या टोळीविरोधात 20 युवकांनी भारतात परतल्यानंतर तक्रारी दाखल केल्या आहे. यानंतर सतीश शर्मा (अंधेरी पूर्व) यांच्या तक्रारीवरून कारवाई सुरू झाली आहे.
या गुन्ह्याचा तपास महाराष्ट्र नोडल सायबर पोलिस, परराष्ट्र मंत्रालय, आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आला. अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी यादव यांनी सांगितले की, या प्रकरणात अनेक तरुणांचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या कारला अपघात…
अभिनेता सोनू सूद याच्या विरोधात अटक वॉरंट जारी…
अभिनेता सैफ अली खानने जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याची घेतली भेट…
भाजपच्या बड्या नेत्यासह दोघांवर अभिनेत्रीने केला बलात्काराचा गु्न्हा दाखल…
अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…

