
पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने केली मारहाण; कारण…
पुणे : पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिस दुचाकीवरून जात असताना पीएमटी चालकाने दुचाकीला खेटून बस चालवल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि मारहाणीची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिस शिपाई आणि पीएमटीचा ड्रायव्हर यांच्यात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यावेळी, वाहनचालक हा चालकाच्या सीटवर बसलेला दिसून येतो, तर पोलिस शिपाई त्यास मारहाण करत असल्याचे दिसते. या हाणामारीत दोघेही एकमेकांची कॉलर पकडून मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, दोघांनीही सामोपचाराने हा वाद मिटवला आहे.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
कोरेगाव पार्क परिसरातील पीएमटीचालक आणि पोलिसामध्ये किरकोळ कारणावरुन हा वाद झाला होता. चालकाने गाडी चालवताना पोलिस शिपायाच्या दुचाकीजवळून चालवल्याचा आरोप पोलिसाने केला आहे. त्यावरुनच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती, पुढे हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस शिपायाने स्वत: पोलिस ठाण्यात अर्ज देत सामोपचाराने आमचं भांडण मिटलं असल्याचे म्हटले आहे.
पीएमटी चालकास मारहाण करणाऱ्या पोलिस शिपायाने कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे अर्ज केला आहे. त्यानुसार, उपरोक्त विषयान्वये अर्ज सादर करतो की, दि. 21/07/2024 वार रविवार रोजी माझा व PMT चालक PMT 5. MH12 F2 8243 यांच्याशी माझे किरकोळ वाद झाला होता. सदर चालक भागवत तोरणे व मी स्वत: पोलिस स्टेशन या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी आमच्यात सदर तक्रारीबाबत समजुतीने वाद मिटवण्यात आला आहे. तरी सदर व्यक्तीबाबत माझी कोणतीही तक्रार नाही, त्यांचा PMT चे ट्रिपचे नुकसान झाले असे त्यांचे म्हणूने आहे, त्यानुसार मी त्यांचे 3000/- रुपये रोखीने भरले आहेत, असा जबाबच पोलिस शिपाई आर.ए. वाघमारे यांनी लिहून दिले आहे.
Happy Birthday! रियल लाईफ दबंग अधिकारी IPS सत्यसाई कार्तिक!
IAS पूजा खेडकर कुटुंबाच्या घराची पोलिसांकडून झडती; पुरावा हाती…
पुणे पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेणार गुगलची मदत…
धक्कादायक! पुणे शहरात दोन अल्पवयीन मुली एकत्र प्यायल्या दारू अन् पुढे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

