पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने दारू संपवल्यामुळे नवरा चिडला अन्…
जळगाव : हतनूर धरणावर कामासाठी आलेल्या नवऱ्याने स्वत:साठी आणलेली दारू पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने प्यायल्यामुळे नवऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शांती देवी (३६) असे मृत महिलेचे नाव असून जितेंद्र गंगाराम हेमराम (२५, रा. युपी) असे आरोपी पतीचे नाव आहे.
हतनूर येथील वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या ठिकाणी परराज्यातील मजूर कामासाठी आले आहेत. जितेंद्र हेमब्रम व शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम हे दोघे देखील या ठिकाणी मजुरीचे काम करतात. दोघा पती पत्नीला दारूचे व्यसन होते. रविवार (ता. १७) दुपारच्या वेळी पतीने दोघांसाठी दारु आणली होती मात्र, सायंकाळच्या जेवणाच्या आधीच पत्नी शांतीदेवीने दारू एकटीने संपविली. थोड्या वेळाने पती जितेंद्र घरी येऊन घरातील दारू हुडकत होता त्याला दारू न सापडल्याने त्याने पत्नीला माझ्या वाटेची दारू कुठे आहे? असे विचारले असता ती मी प्यायल्याचे सांगताच पतीने पत्नीला रागाच्या भरात लाथा बुक्याने मारहाण करून तीचा गळा दाबून ठार केले.
जितेंद्र घरात बसून होता. मात्र बराच वेळ झाला तरी यांचा आवाज का येत नाही म्हणून शेजारी त्यांच्या घरा जवळ येऊन विचारपुस केली. पती जितेंद्र याने माझी पत्नी उठत का नाही, तिला बघा म्हणून सांगितले. शेजाऱ्यांनी तिला उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी तपासणी करुन तिला मृत घोषित केले. पत्नीची हत्या झाल्याचे समजताच जितेंद्र याने साप चावल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. पण, शवविच्छेदनामध्ये पत्नीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुड हे करीत आहे.
धक्कादायक! संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीची केली हत्या अन् पुढे…
जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…
पत्नीची हत्या केली अन् नवऱ्याला आला हृदयविकाराचा झटका…
पुणे शहरात पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण…
दोन पत्नींसोबत एकत्र राहात असलेल्या पतीला एकीने पकडले अन्…