निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी निखील पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपायुक्त अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (ता.12) पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश दिले आहेत.
निखील पिंगळे यांनी सोमवारी झेंडे यांच्याकडून गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदाचा कार्यभार देखील स्वीकारला. शिरूर तालुक्यातील निखील पिंगळे हे 2014 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापुर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर, अपर पोलिस अधीक्षक वर्धा, एसआरपीएफ कमांडंट गडचिरोली, पोलिस अधीक्षक लातूर, पोलिस अधीक्षक गोंदिया येथे उल्लेखनिय काम केले आहे. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण राजगुरूनगर येथे पुर्ण केले असून, एमआयटी येथून आयटी इंजनियरींगचे शिक्षण पुर्ण केले आहे.
अमोल झेंडे हे पोलिस दलात गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत आहेत. पुरंदर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील जन्म. प्रतिकूलतेवर मात करत अगदी पहिलीपासून ते एमपीएससीपर्यंत कोणताही खासगी क्लास न लावता घरच्या घरी अभ्यास करून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. पोलिस दलातही मोठी कामगिरी पार पाडत आहेत. उपायुक्त अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.
अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
विशेष शाखेच्या उपायुक्तपदी जी. श्रीधर…
विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी जी. श्रीधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त हिंम्मत जाधव यांना परिमंडळ चारचा कार्यभार देण्यात आल्यामुळे हे पद रिक्त होते. तेथे आता श्रीधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी पोलिस अधीक्षक हिंगोली येथे श्रीधर कार्यरत होते. नुकतीच त्यांची पुण्यात बदली झाली आहे.
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…