जळगावमध्ये संशयावरून चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या; पुत्नीची मृत्यूशी झुंज सुरू…

जळगाव : एका नवऱ्याने आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्यावर कुऱ्हाडीने वार करुन हल्ला केल्याची धक्कादायक घटना देवळी गावी घडली आहे. या घटनेत दोन्ही चिमुकल्यांनी जागीच मृत्यू झाला आहे, तर पत्नी या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी संजय पावरा यांचे काही वर्षापुर्वीच लग्न झाले होते. त्यांना दोन मुले होती. संजयने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घ्यायला सुरूवात केली होती. संजय सतत चारीत्र्यावर संशय घेत होता. घटनेच्या दिवशी पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याच भांडणातून संजयने संतापाच्या भरात दोन चिमुकल्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर पत्नीच्या डोक्यावरही कुऱ्हाडीने पाच ते सहा वार करुन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, शेजाऱ्यांना ही घटना कळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत आरोपीच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केले. पण पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केल्याने तिच्या मेंदुला जबर मार बसला आहे. तिच्यावर सध्या धुळे येथील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.

शेजाऱ्यांनी संजय पावरा याला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जळगाव जिल्हा हादरला असून, दोन चिमुकल्यांचा जीव गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक! आईने घरात घेतला गळफास तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये…

Video: पुणे ग्रामीण पोलिसांनी स्मशानभुमी मधील लाकडावरुन उघड केला खुनाचा गुन्हा…

अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा…

धक्कादायक! प्रियकराला संपवले आणि गर्लफ्रेंड बनण्यास नकार देताच…

धक्कादायक! दत्तक घेतलेल्या मुलासोबतच ठेवले अनैतिक संबंध अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!