पुणे जिल्ह्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; कंपनी सील; ड्रग्ज जप्त…

पुणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडीत फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, नार्कोटिक्स विभागाकडून कंपनी सील करण्यात आली आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात असताना शिरुर तालुक्यातील छोटयाशा मिडगुलवाडी गावात नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने एका कंपनीवर छापा टाकला. या कारवाईत तब्बल एकशे चौऱ्याहत्तर किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. तसेच दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. पथकाने ही कंपनी सील केली असून परिरात खळबळ उडाली आहे.

मिडगुलवाडी (ता. शिरुर, जि. पुणे) येथे एका फिनेल बनवणाऱ्या कंपनीवर नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने शिक्रापूर पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छापा टाकला. ही कारवाई इतकी गोपनीय होती की यावेळी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तीस तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरु होती. या कारवाईने पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. दरम्यान येथे मोठ्या प्रमाणात केमिकल आढळून आले आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये फारशी पुसण्याचे फिनेल हे केमिकल बनवले जात असल्याचे ग्रामस्थ सांगत होते. शेड व कंपनी अतिशय जंगलात असल्याने कोणालाही काही माहिती नव्हती. नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत १७४ किलो अल्प्राझोलम नामक ड्रग्ज व इतर साहित्य जप्त करण्यात आले. संपूर्ण कंपनीचे मुख्य शटर तसेच गेट सील करण्यात आले आहे. या कारवाईत शेकडो लिटर केमिकल ओतून देत काही साहित्य जाळून नष्ट केले. तर त्या कंपनीचे शेड मागे केलेल्या मोठ्या दोन खड्डयामध्ये काही केमिकल व ड्रग्ज सदृश पदार्थ दिसत असून शेडच्या परिसरात उग्र वास येत आहे. मात्र सदर कारवाईने शिरुर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचा ललित पाटील प्रकरणाशी काही संबंध आहे? पुणे जिल्ह्यात सध्या ललित पाटील प्रकरण चांगलेच तापले असताना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव व मिडगुलवाडी या दोन्ही ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा जप्त केला गेल्याने या घटनेशी ललित पाटील चा काही संबंध आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मिडगुलवाडी ता. शिरुर येथे दुर्गम भागातील शेतात पत्र्याचे मोठे शेड व त्याला पत्र्याचे कंपाउंड मारून त्यामध्ये फारशी पुसण्याचे फिनेल बनवल्याने भासवून काही नागरिकांना फिनेल देऊ करत तेथे आतमध्ये चक्क अल्प्राझोलम ड्रग्ज बनवले जात असल्याचे समोर आले आहे. मिडगुलवाडीच्या शेजारी अनेक पत्रा शेड मिडगुलवाडी (ता. शिरुर) नजीक कान्हूर मेसाई, हिवरे कुंभार, खैरेवाडी, सविंदणे येथील अनेक ठिकाणी दुर्गम भागात कुदळवाडी भागातील अनेक व्यवसायिकांनी जागा खरेदी करत मोठमोठे पत्रा शेड मारून तेथे दुर्गम भागात व्यवसाय उभारल्याचे दाखवले आहे. त्याबाबत देखील आता शंका उपस्थित होत आहे. तसेच या परीसरातील अनेक डेअऱ्यामध्ये केमिकलयुक्त दुध, व केमिकल वापरून दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती केली जात आहे. यावर कारवाई होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!