इंदुरीकर महाराज यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश…

अहमदनगर: PCPNDT कायद्यानुसार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची आज (शुक्रवार) संगमनेर प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अपत्य प्राप्ती संदर्भात फेब्रुवारी 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्यावर जुलै 2020 मध्ये PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या वक्तव्यावर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी इंदुरीकर यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, संगमनेर सत्र जिल्हा न्यायालयाने इंदोरीकर यांना गुन्ह्यातून मुक्त केल्यानंतर अंनिसने औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून इंदुरीकर महाराजांविरोधात खालच्या कोर्टात खटला चालवण्याचा आदेश दिला. या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी इंदुरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यानुसार इंदोरीकर महाराजांवर दाखल प्रकरणाची संगमनेरचा प्रथम वर्ग न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी इंदुरीकर महाराज यांना समन्स बजाविण्यात आले असून ते हजर राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, इंदुरीकर महाराज यांनी शिर्डी येथील ओझरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनात वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला होता. इंदुरीकर यांचे हे वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

इंदुरीकर महाराज यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका…

भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर

‘गजानन महाराज’ बनून फिरणारी व्यक्ती कोण? समोर आली माहिती पण…

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजाला अटक…

Video: कंबलवाले बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा; कारवाईची मागणी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!