
मुंबईतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षिकेचा दावा…
मुंबई: एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षिकेला (वय ४०) अल्पवयीन विद्यार्थ्याशी (वय १६) शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता या आरोपी शिक्षिकेने जामिनासाठी अर्ज केला आहे, विद्यार्थी आणि शिक्षिका या दोघांमधील संबंध हे परस्पर संमतीने होते, असा दावा या जामिनासाठी दिलेल्या अर्जात म्हटले आहे. विद्यार्थी तिला मेसेजमध्ये पत्नी म्हणून संबोधत होता. शिवाय, प्रेमाने तो आपल्याला ‘किकी, पुकी’ म्हणायचा, असा दावा देखील महिलेने केला आहे.
आरोपी शिक्षिकेने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला याचिका दाखल केली होती. दादर पोलिसांना पिडीत अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या कुटूंबातील सदस्यांनी दिलेल्या तक्रारीत, अल्पवयीन विद्यार्थ्याने आरोप केला आहे की आरोपी शिक्षिका गेल्या एक वर्षापासून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होती. त्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची आणि दारु पाजल्यानंतर जबरदस्तीने त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवत होती. दुसरीकडे, शिक्षिकेने या संपूर्ण प्रकरणात युक्तिवाद केला आहे की, तो मुलगा “तिच्या प्रेमामध्ये वेडा आहे” आणि त्याला तिच्या नावाचा टॅटू आपल्या शरीरावर विशिष्ट ठिकाणी काढायचा होता. तिने त्या शाळेतून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो तिला वारंवार समजावत होता, असेही तिने म्हटले आहे.
शिक्षिकेने केलेल्या दाव्यानुसार मुलाच्या पालकांनी त्याला खटला दाखल करण्यास भाग पाडले आहे. त्याच्या आईला दोघांच्या नात्याबद्दल आधीच माहिती होती. तिने मुलाचा फोन आणि लॅपटॉप काढून घेतला होता, जेणेकरुन ते दोघे संवाद साधू शकणार नाहीत. शिक्षिकेने सांगितले की मुलगा काही महिन्यांतच वयाची 18 वर्ष पूर्ण करुन सज्ञान होणार होता. मात्र परिस्थिती समजून घेण्याइतका प्रौढ आहे, हेही तिने सांगितले आहे.
शिक्षिकेने सांगितले की तिच्याकडून कोणतीही धमकी किंवा जबरदस्ती त्याच्यावरती झालेली नव्हती. तिने आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी दोघांमध्ये झालेल्या ईमेल आणि मेसेजचा दाखला दिला आहे. तिने दावा केला की तो मुलगा तिला भेटण्याचा आग्रह करत होता. परंतु, काही काळानंतर, तिनेच त्याला आपल्या आईची परवानगी घेण्यास सांगितले होते.
मुंबई! विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…
मुंबईत शिक्षिकेने विद्यार्थ्याला दारू पाजून करत राहिली लैंगिक अत्याचार…
शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ…
धक्कादायक! मुंबईतील महाविद्यालयात युवतीचा मृत्यू; हत्या की आत्महत्या…
नवी मुंबईत धावत्या बसमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या दोघांना शिक्षा…
पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…
सातारा! विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं; प्रेमविवाह अन् पुन्हा प्रेम…
प्रेम प्रकरण! फोन सायलेंट मोडवर अन् प्रेयसीचा झाला मोठा गैरसमज…

