हनिमूनच्या खोलीत नवरदेव मोठ-मोठ्याने लागला ओरडू अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरदेवर खोलीत गेल्यानंतर काही वेळातच नवरीने घरातील दागिने आणि पैसे गोळा केले आणि धूम ठोकली. याबाबतची माहिती नवरदेवाला समजताच त्याला मोठा धक्का बसला आणि मोठ-मोठ्याने ओरडू लागला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवरदेवाने न्याय मिळावा यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच पैसे आणि दागिने मिळावेत, अशी मागणी केली. जालौन शहरातील एका महिलेने मध्यस्थांशी संपर्क साधून 70 हजार रुपये घेऊन मुलाचे लग्न ठरवले. मध्यस्थांनी गोरखपूरची रहिवासी असलेल्या पूजासोबत लग्न जमवले. गेल्या आठवड्यात पूजा जालौन येथे आली आणि एका मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार मुलाशी लग्न केले. लग्नानंतर वधू तिच्या सासरच्या घरी पोहोचली, जिथे वराने तिचे आनंदाने स्वागत केले. लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले होते. हनिमूनच्या रात्री नवरदेव वाट पाहत होता. काही वेळातच नवरीने दागिने, रोख रक्कम घेऊन पळ काढला.

पीडित मुलाची आई सरस्वतीने सांगितले की, ‘लखन सिंह आणि चरण सिंह बाहेरून मुली आणतात आणि त्यांची लग्न करतात. त्यांच्या मुलाचं लग्न लावून देण्याच्या बदल्यात त्यांनी 70 हजार रुपये घेतले होते. त्या दोघांनीच मुलीला पळून जाण्यात मदत केली. लग्नानंतर लुटण्यात आलेल्या रोकड आणि दागिन्यांमध्ये त्यांचा हिस्सा आहे. त्यांच्या सांगण्यावरून वधूने चोरी केली आणि रात्री पळून गेली.’ दरम्यान, गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…

हनिमूनची तयार करत असतानाच नवरीची रवानगी कारागृहात…

हनिमूनच्या रात्रीच पत्नीने केली नवरदेवाला बेदम मारहाण…

हनिमूनच्या रात्री नवरदेव मोठमोठ्याने ओरडत आला खोलीबाहेर…

हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!