Video: संतापजनक! शिक्षिकेने 4 वर्षीय मुलीला मारले तब्बल 30 वेळा…
सूरत (गुजरात): एका शाळेतील शिक्षिकेने एका चार वर्षांच्या मुलीला तब्बल 30 वेळा मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.
जशोदाबेन खोखरिया असे आरोपी महिलेचे नाव आहे. शिक्षिका मुलीच्या शेजारी बसून तिच्या पाठीवर आणि गालावर 30 वेळा मारताना दिसत आहे. सहायक पोलीस आयुक्त विपुल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून, पुढील तपास करत आहोत.’
शाळेच्या पूर्व-प्राथमिक विभागात शिकणाऱ्या मुलीच्या पालकांनी सीसीटीव्ही फुटेज मीडियासोबत शेअर केल्यावर ही बाब उघडकीस आली. सोमवारी वर्ग सुरू असताना खोखरिया त्यांच्या मुलीच्या पाठीवर आणि मारताना दिसली. गुजरातचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पंशेरिया यांनी मुलीशी झालेल्या गैरवर्तनाचा निषेध केला आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना घटनेची चौकशी करण्यास सांगितले. शाळेच्या प्रशासनाने काही वेळातच या शिक्षिकाला शाळेतून निलंबित केले आहे.
मुलीच्या पालकांनी सांगितले की, ‘मुलगी घरी आली तेव्हा तिच्या अंगावर अनेक खुणा होत्या. शाळेतील शिक्षिकेने तिला बेदम मारहाण केल्याचे तिने सांगितले नाही. मात्र, मुलीच्या पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना वर्गातील सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास सांगितले. सीसीटीव्हीमधून घटना उघड झाल्यानंतर आम्हाला न्याय हवा असल्याचे सांगितले.’
સુરતની સાધના નિકેતન સ્કૂલની શિક્ષિકાની ક્રૂરતા…વિડિયો જોઈ તમારા પર રુવાંટા ઉભા થઈ જશે#Surat #School #Teacher@prafulpbjp pic.twitter.com/3uz2pRjSmH
— Jay Acharya ( VTV NEWS ) (@AcharyaJay22_17) October 11, 2023
विद्यार्थिनीला मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल…
शिक्षकाने ब्लॅकमेल करत असल्याचे स्टेटस ठेवून केली आत्महत्या…
शिक्षकाने स्वतःच्या जागी ठेवला रोजंदारीवर निवृत्त शिक्षक; वर्गातच जुगार…
Video: विद्यार्थ्याने लाइव्ह क्लासमध्ये शिक्षकाला मारले चपलेने; पण का?
महाराष्ट्र हादरला! शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं…
शिक्षकाने बॅड टच करत तुला पीटी क्लास कसा वाटला? असे विचारले अन्…