हृदयद्रावक! पुणे शहरात चहा पित असताना डोक्यावर पडली झाडाची फांदी…

पुणे: पुणे शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात युवक चहा पित असताना त्याच्या डोक्यावर झाडाची फांदी पडली. या घटनेत युकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी (ता. २६) संध्याकाळी ही घटना घडली असून, विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

अभिजित गुंड (वय ३२, रा. कसबा पेठ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पुणे येथील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. या ठिकाणी झाडाखाली अभिजित गुंड चहा पीत उभे होते. त्याचवेळी त्यांच्या डोक्यात झाडाची फांदी पडली. त्यांना गंभीर मार लागला. या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तात्काळ त्यांना रिक्षामधून रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अभिजित गुंड हे चहा पिण्यासाठी ओंकारेश्वर मंदिर परिसराखाली असलेल्या टपरीवर आले आणि त्यांचा तो शेवटचा चहा ठरला.

अभिजित गुंड यांच्या मृत्यूला पुणे महानगरपालिकेतील विश्रामबाग क्षत्रीय कार्यालयाचे तसेच गार्डन विभागाचे अधिकारी दोषी आहेत. अधिकाऱ्यांकडे या झाडांसंदर्भात वारंवार तक्रार करून देखील प्रशासन विभाग ढिम्म होते. अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा करण्यात यावा, अशी मागणी मृत्यू झालेल्या गुंड यांच्या मित्रांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.

हृदयद्रावक! पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आणण्याची वेळ आली बापावर…

हृदयद्रावक! दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आल्या अन्…

हृदयद्रावक! डुकरांची शिकार नव्हे तर सख्ख्या भावांचा गेला बळी…

हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला चिकटून रात्रभर रडत राहिला चिमुकला…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!