
गज्या मारणे टोळीकडून मंत्री मोहोळ यांच्या कर्मचार्याला बेदम मारहाण…
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील काही गुंडांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी आणि पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना कोथरूड परिसरात घडली होती. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन जणांना अटक करण्यात आली तर चौथा आरोपी गजा मारणेचा भाचा फरार आहे, या प्रकरणाबाबत पुण्याचे झोन-3 चे पोलीस उपआयुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे.
देवेंद्र पुरुषोत्तम जोग (वय 33, रा. कोथरूड) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गाडीचा धक्का लागल्यामुळे एका अज्ञात आरोपीने मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली होती. शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड परिसरातील भेलके नगर आणि मयूर कॉलनी परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. तक्रारीवरून सुरुवातीला 324 चा गुन्हा दाखल केला होता. यानंतर मारणे टोळीचे काही व्यक्ती त्या ठिकाणी असल्याचे समोर आले होते. त्यातले चार आरोपी निष्पन्न केले. त्यातले तीन आरोपी ताब्यात घेतले आहेत आणि एक आरोपी फरार आहेत, अशी माहिती पोलीस उपआयुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.
चारही आरोपी गजानन मारणे टोळीच्या संपर्कातले आहेत. फिर्यादी आणि आरोपी यांचे काही वैर नाही. या प्रकरणात संघटित गुन्हेगारीच कलम लावण्यात आला आहे. या प्रकरणात गजा मारणे याचा भाचा बाबू पवार याचाही समावेश आहे. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र जोग यांना व्हिडीओ कॉल करून विचारपूस केली आहे. देवेंद्र जोग हे मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्क कार्यालयात सोशल मीडिया कॅम्पेनिंगसाठी मदत करतात. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु ठेवला असून, फरार आरोपी बाबू पवार याचा शोध घेत आहेत.
भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी अन् पत्रात…
एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मामा भाच्याला अटक…
पुणे पोलिस आयुक्तांनी ऋषिराज सावंत बाबत दिली महत्त्वाची माहिती…
राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय…
पुणे शहरात चुलत भावाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिल्याने झाला मृत्यू…

