सैफ अली खान हल्ला प्रकरणी मोठा ट्विस्ट; अटकेत असलेला आरोपी…

मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्या घरात एक नाही तर दोन आरोपी होते, अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. सैफच्या घरात घुसणारा आरोपी मोहम्म शरीफुल इस्लाम शहजाद एकटाच नसून त्याचा आणखी एक साथीदार असल्याचा संशय पोलिसांना आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातून जवळपास 200 हून अधिक फिंगरप्रिंट्स घेतले होते. ते फिंगरप्रिंट्स शरीफुलच्या फिंगरप्रिन्टशी मॅच होत आहेत की नाही याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळेच हे फिंगरप्रिन्ट शरीफुलशी मॅच होत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सैफ प्रकरणात जो आरोपी पकडला गेला आहे. तो आरोपी नाहीच, तो एकटा नव्हता, त्याचा आणखी एक साथीदारही त्याच्यासोबत होता असा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांनी 24 जानेवारीला आरोपी शरीफुल इस्लाम याला न्यायालयात हजर केले होते. पोलिसांनी कोर्टाला सांगितले की शरीफुल भारतात एकटा आला नाही. बांगलादेशातून त्याचे आणखी काही साथीदारही त्याच्यासोबत आल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी कोर्टाकडून आरोपी शरीफुलची पोलीस कोठडी 29 जानेवारीपर्यंत वाढवून घेतली आहे. तसेच शरीफुलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचे आई-वडील समोर आले. त्यांनी मीडियासमोर प्रतिक्रिया दिली. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती हा शरीफुल नाही. तो आमचा मुलगा नाही, दोघांचे चेहरे मॅच होत नाहीत, असा दावा त्यांनी केला होता.

अभिनेता सैफ अली खानने जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याची घेतली भेट…

सैफ अली खानच्या घरात 12 जण असताना हल्लेखोर पळाला कसा? करिनाने तर…

सैफ अली खानवरील हल्लेखोराने पोलिसांना सांगितला ओलीस ठेवण्याचा ‘मास्टरप्लान’…

अभिनेता सैफच्या घरात कसा घुसला? आरोपीने सगळंच सांगितलं; बांगलादेशला पळणार तोच…

अभिनेता सैफ अली खानचा हल्लेखोराला अटक; खरं नाव समोर…

करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले; चोरटा खूप आक्रमक पण…

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलमध्ये बसला अन्…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण! मोलकरणीने सांगितला घरातला संपूर्ण घटनाक्रम…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…

अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!