
गौतमी पाटीलवर कारवाई करता येणार नाही; पोलीस उपायुक्तांनी सांगितले कारण…
पुणे : पुणे शहरातील नवले पूला जवळ नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करा आणि तिच्यावर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली आहे.
रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप पुणे पोलिसांनी फेटाळले आहेत. अपघातावेळी गौतमी पाटील या गाडीत होती की नाही याचा तपास सुरू आहे, पण चालकावर कारवाई केली आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.
कायद्यानुसार अपघातात को-पॅसेंजरवर कारवाई केली जात नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे, गौतमी पाटीलवर कोणतीही कारवाई करता येणार नाही. गौतमी पाटील हिने गाडीचे संपूर्ण कागदपत्रं पोलिसांकडे सादर केली आहेत. तसेच, गरज भासल्यास गौतमी पाटील हिला चौकशीसाठी बोलवले जाईल. मात्र, गौतमीला सध्या तरी चौकशीसाठी बोलवण्यात आलेले नाही. गौतमी पाटील गाडीत होती की नाही याबाबतचे कोणतंही स्पष्टीकरण अजून समोर आलेले नाही. संपूर्ण प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे सुरू असल्याचे पुणे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे. गौतमी पाटील हिच्या कार चालकाची चूक असताना हा अपघात झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची गौतमी पाटीलच्या टीमकडून दखल घेण्यात आली नाही. तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही उपलब्ध होत नाही, पोलिस योग्य ते सहकार्य करत नाहीत असा आरोप आता रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोषींवर कडक कारवाई करण्याची निर्देश दिले आहेत. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी गौतमी पाटीलवर कुठलाही कारवाई करता येणार नसल्याचे म्हटले. त्यासाठी, त्यांनी कायदेशीर बाजूही सांगितली आहे.
View this post on Instagram
गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांचं मोठं पाऊल…
पुणे! गौतमी पाटील हिच्या कारला भल्या पहाटे भीषण अपघात…
गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली…
गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमात शिरला साप अन्…
गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल…
… तर मी कार्यक्रम करणं खरंच बंद करेन : गौतमी पाटील

