
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीमधील अतुल अनिल धोत्रे (टोळी प्रमुख) व त्याच्या इतर ०२ साथीदारां विरुध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८४वी कारवाई आहे.
माणिकचंद टॉवर कमर्शियल कॉम्प्लेक्स, होमी भाभा हॉस्पिटल शेजारी, वडारवाडी, पुणे येथे फिर्यादी यांचे कामगार २५/१०/२०२३ रोजी इंटरनेटची एरीयल फायबर टाकण्याचे काम करीत होते. जबरदस्तीने काम थांबवुन, तुम्ही आमची परवानगी घेतली का, वडारवाडी, पांडवनगर भागात आमच्या परवानगी शिवाय कोणी केबलचे काम करत नाही, असे म्हणून फिर्यादी यांना जर तुम्हाला काम करायचे असल्यास आम्हाला दर महिन्याला १०,००० /- रुपये दयावे लागतील असे म्हणून, फिर्यादी यांच्याकडे बेकायदेशीर खंडणीची मागणी केली. २५/१०/२०२३ रोजी हॉटेल रेड, पान्डा चायनिज, दिप बंगला चौक, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी तडजोडी अंती फिर्यादी यांचेकडून ४००० रुपये स्विकारले. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन पुणे शहर गु.र.नं.७५६/ २०२३, भा.दं.वि. कलम ३८४, ३८५, ३८६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाच्या तपास दरम्यान यातील निषन्न आरोपी
१) अतुल अनिल धोत्रे (वय २१, रा.३३६/२, जुनी वडारवाडी, कुसाळकर बिल्डिंग, पुणे (टोळी प्रमुख),
२) तेजस शिवाजी विटकर (वय २१ वर्ष रा.ब्लॉक नं.३०,वडारवाडी, पुणे)
३) निखील शिवा कांबळे (वय १९ वर्ष, रा. पांडवनगर, पुणे (टोळी सदस्य) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
गुन्हयाचे तपासा मध्ये सदर आरोपी अतुल अनिल धोत्रे (टोळी प्रमुख) याने त्याचे राहते भागात वडारवाडी, जनवाडी, गोखलेनगर या परिसरात दहशत निर्माण करणे कामी स्वतःची टोळी तयार केली असून तो सदर भागात दहशत निर्माण करणे, तसेच टोळीमधील दरवेळी नवीन सभासद घेऊन गुन्हे करत असतो. या भागातील रहिवाश्यांना मारहाण करुन व लुटालुट करुन दहशत निर्माण करीत असतो. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायद्याअंतर्गत मालाविरुद्धचे तसेच शरीराविरुद्धचे तसेच फौजदारी (सुधारणा) कायदा कलम अंतर्गत गंभिर गुन्हे दाखल आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१)(ii).३(२) ३(४) प्रमाणेचा अर्तभाव करणेकामी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ ०४ पुणे शशीकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन वरील आरोपी यांना चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि क्र ७५६/२०२३ भा.दं.वि. कलम ३८४,३८५,३८६, ३४ प्रमाणे अर्तभाव करण्याची अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, आरती बनसोडे या करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदिप कर्णीक, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा,
पोलिस उप-आयुक्त, परी-०४, पुणे, शशीकांत बोराटे, सहाय्यक पोलिस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली चतुःशृंगी पोलिस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलिस निरीक्षक, गुन्हे, अंकुश चिंतामण, पोलिस निरीक्षक, गुन्हे, जगन्नाथ जानकर, तपासी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक अनिल केकाण व निगराणी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक, रत्नदीप गायकवाड, पोलिस अमंलदार, अमित गद्रे व सुहास पवार यांनी केली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ८४ वी कारवाई आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…
पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…