पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…
पुणे (संदीप कद्रे): पर्वती पोलिस स्टेशन हद्दमधील ऋषिकेश दिपक जगताप (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०५ साथीदारां विरूध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत केलेली ही ७१ वी कारवाई आहे.
०५/०९/२०२३ रोजी फिर्यादी हे त्यांचे मित्रांसोबत बिल्डींग चौक, दत्तवाडी पुणे येथे गप्पा मारत थांबले असताना,दुचाकीवरून आलेल्या इसमांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्याबाबत फिर्यादी यांनी त्यांना विचारणा करता ऋषिकेश दिपक जगताप व त्याचे इतर साथीदार यांनी त्यांचेकडील तलवारीने फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांचेवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. सदर परिसरातील नागरीकांना धमकी देवुन, त्या भागात दहशत निर्माण केली होती. त्याबाबत पर्वती पोलिस स्टेशन गु.रं. नं. २६४/२०२३, भा.दं.वि.क. ३०७, ३२६, १४३, १४४, १४७, १४८, १४९,३२३,५०४,५०६, आर्म अॅक्ट ४ (२५),म.पो.अधि. कलम ३७ (१) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास करीत असताना, सदरचा गुन्हा हा आरोपी
१ ) ऋषिकेश दिपक जगताप, वय २५ वर्ष, रा. स.नं. १३०, दांडेकर पुल, पुणे ( टोळी प्रमुख)
२) संकेत ऊर्फ बल्ली राहूल वाघमारे, वय २० वर्षे, रा. दांडेकर पुल, सिंहगड रोड, पुणे
३ ) निखिल बिभिषण लगाडे, वय २८ वर्ष, रा. दांडेकर पुल, पुणे
४) गणेश गौतम वाघमारे, वय १९, रा. दांडेकर पुल, पुणे
५) आदिनाथ सोपान साठे, वय २९ वर्षे, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा पुणे ( टोळी सदस्य )
६) राम मोहन बनसोडे, वय २३, रा. दांडेकर पुल, दत्तवाडी, पुणे यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
आरोपीं ऋषिकेश दिपक जगताप याने संघटित गुन्हेगारी टोळी तयारी केली असून, सदर टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी इतर फायदा मिळविण्याचे उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवून किंवा धाक दाखवून जबरदस्ती करून अवैद्य मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला आहे. त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.
दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१)(ii),३(४) प्रमाणे मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पर्वती पोलिस स्टे पुणे यांनी पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – ०३, पुणे, सुहेल शर्मा यांचे मार्फतीने अप्पर पोलिस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील यांना सादर केला होता. सदर प्रकरणी छाननी करून पर्वती पोलिस स्टेशन गु.रं. नं. २६४/२०२३, भा.दं.वि.क.३०७, ३२६, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३,५०४,५०६, आर्म अॅक्ट ४ (२५), म.पो.अधि.कलम ३७ (१)१३५,क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii).३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, प्रविण कुमार पाटील यांनी मान्यता दिलेली आहे. पुढील तपास मा. सहाय्यक पोलिस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे, आप्पासाहेब शेवाळे हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, प्रविणकुमार पाटील, पोलिस उपआयुक्त परिमंडळ – ०३, सुहेल शर्मा, सहा. पोलिस आयुक्त, सिंहगड रोड, पुणे, आप्पासाहेब शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पर्वती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), विजय खोमणे, पोलिस उपनिरीक्षक, चंद्रकांत कामठे, पोलिस अंमलदार, दिपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे, राजू जाधव, कुंदन शिंदे, जगदीश खेडकर यांनी केली आहे.
पोलिस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणांवर बारकाईने लक्ष देवून शरिराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ७१ वी कारवाई आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत १२वी कारवाई…
पुणे शहरातील आंदेकर टोळीच्या प्रमुखासह ९ जणांना अटक; पाहा नावे…
ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…
पुणे शहरात एमपीडीए कायद्यान्वये ४५वी स्थानबध्दतेची कारवाई!
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!