
यवतमाळ येथील खुनाच्या खटल्यातील आरोपीला जामीन मंजूर…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मेंडकीपुरा यवतमाळ येथे 3 एप्रिल 2023 रोजी देवांशु याचा खुन झाल्याची घटना समोर आली होती. त्यात यवतमाळ शहर पोलिस स्टेशन येथील पोलिसांनी चौकशी करून मृतकाचे वडीलांच्या रिपोर्ट वरुन भादंवि. कलम 302 अंतर्गत आरोपी शेख समीर शेख जमीर विरूद्ध गुन्हा नोंदविला होता. सदर प्रथमदर्शी अहवालानुसार शहर पोलिसांनी तपास करून यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सादर केले.
सदर प्रकरणात आरोपीचे वकील ॲड. एस. एम. अली यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात ॲड. एस. एम. अली व ॲड. नौशीन शहा यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. यावरून जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. लउळकर यांनी सरकारी पक्ष व आरोपी पक्ष या दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी समीर उर्फ सोनु याचा जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, सदर प्रकरणात आरोपी सोनूने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. आरोपी तर्फे ॲड. एस. एम. अली, ॲड. नौशीन शाह यांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता.
पोलिस अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

