पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगार अजय साळुंखे याच्यावर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्द कारवाईचे अर्ध शतक असून, केवळ १० महिन्याचे कालावधीतील ही कामगिरी केली आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयातील हडपसर पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार अजय विजय साळुंखे (वय २१, राहणार औदुंबर पार्क, गोपाळपट्टी मांजरी, पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चाकु, कोयता या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह जबरी चोरी, खंडणी, गंभीर दुखापत, दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचे विरूध्द ०६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी त्याच्या विरुध्द एम. पी.डी.ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा पदभार स्विकारल्यानंतर सराईतपणे गुन्हे करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे, अवैध धंदे करणारे, सराईत गुन्हेगार यांचेवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलिस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यापासून १० महिन्याचे कालावधीमध्ये सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणा-या, दहशत निर्माण करणाया ५० अट्टल गुन्हेगारांना एम. पी. डी. ए. कायद्यांतर्गत राज्यातील विविध कारागृहामध्ये स्थानबध्द केले आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाचे अंतर्गत प्रथमच इतक्या कमी कालावधीमध्ये अशा स्वरुपाची प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
सदर कारवाईसाठी गुन्हे शाखेचे मोका व एमपीडीए सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलिस उप निरीक्षक राजू बहिरट, सहायक पोलिस उप निरीक्षक शेखर कोळी व दिलीप झानपुरे, पोलिस अंमलदार योगेश घाटगे, संतोष कुचेकर, अविनाश सावंत, सागर बाबरे, अनिल भोंग, तसेच वेगवेगळ्या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व त्याचे अधिपत्याखालील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी अहोरात्र विशेष मेहनत घेऊन कर्तव्य पार पाडले आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलिस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही ५० वी कारवाई असुन, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत १२वी कारवाई…
ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…
पुणे शहरात एमपीडीए कायद्यान्वये ४५वी स्थानबध्दतेची कारवाई!
पोलिस उप आयुक्त स्मार्तना पाटील यांनी पाच गुन्हेगारांना केले हद्दपार; पाहा नावे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!