डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे (संदीप कद्रे): सीकींग ऍडव्हेंचर या डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करून त्यांना लुटमार करून जबरी चोरी करणारे परप्रांतीय एक महिला व एक पुरूष असे दोन आरोपींना सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले आहे.

पुणे शहरातील, महाराष्ट्र राज्यातील व इतर राज्यातील लोकांना सीकींग ऍडव्हेंचर या डेटींग ऍपद्वारे आकर्षीत करून व चॅटींग करून त्यांना मोबाईलवर मुलीचे फोटो पाठवून हॉटेल बुक करायला लावून हॉटेल बुक केल्यावर ग्राहकाकडून ठरलेली रक्कम ऑनलाईन घेत असे. शिवाय, त्या व्यतिरिक्त ग्राहकांना दमदाटी मारहाण करून जबरदस्तीने आणखी जास्तीची रक्कम ऑनलाईनद्वारे घेवून तसेच ग्राहकाकडील मौल्यवान चिज वस्तु, सोन्याचे दागिणे जबरदस्तीने जबरी चोरी करून लुटुन नेणारे अनोळखी एक पुरूष व अनोळखी एक महिला यांचे विरूध्द चंदननगर पोलिस स्टेशन येथे गुरनं ५०२/२०२३ भादवि ३९४, ५०६,३४ व आयटी अॅक्ट ६६ अ,६६ ब अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

वरीष्ठांचे आदेशाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष व सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांचे मार्फत समांतर तपास सुरू असताना नमुद आरोपी हे त्यांची ओळख लपवुन सदरचे गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी वापरलेले विविध इलेक्ट्रानिक गॅझेटचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून सदर गुन्हयातील एक महिला (वय २७, रा. उत्तराखंड) व एक पुरूष (वय २५, रा. दिल्ली) असे दोन आरोपींना तुर्भे (नवी मुंबई) येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे अधिक तपास करता सदरचा गुन्हा हा त्यांनीच केला असल्याचे निष्पन्न झाले असल्याने सदर दोन्ही आरोपीना पुढील कायदेशीर कारवाई कामी चंदननगर पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीकडे केलेल्या प्राथमिक तपासात त्यांनी पुणे शहर तसेच इतर राज्यातील महत्वाच्या शहरामध्ये नामांकित हॉटेल मध्ये ग्राहकांना रूम बुक करण्यास सांगून त्यांचेकडून देखील जबरी चोरी केली असल्याचे माहिती मिळत आहे.

दरम्यान, असा प्रकार इतर कोणाबरोबर घडला असल्यास त्या व्यक्तीने त्याबाबतची माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा पुणे शहर यांच्याकडे देणेबाबत अवाहन केले आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभागाचे भरत जाधव, सपोनि राजेश माळेगावे, स.पो. फौज. राजेंद्र कुमावत, पोलिस अंमलदार मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, सागर केकाण, इम्रान नदाफ या पथकाने यशस्वी केली आहे.

युवतीशी चॅटींग आणि गोड बोलण्याला भुलला युवक अन् पुढे…

पुणे शहरात लहानपणापासूनच्या भांडणातून गोळीबार; एकाचा मृत्यू…

पुणे शहरात महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षीत बंटी-बबलीस अटक…

पुणे शहरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; कोट्यावधींचा मुद्देमाल हस्तगत…

पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!