
पुण्यातील निवडणूकीवर पुणे पोलिसांची करडी नजर; चुक झाल्यास…
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून, याकडे पोलिस यंत्रणा गांभीर्याने पाहत आहे.
पुणे शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार प्रचारादरम्यान नेमके कोणते उपक्रम राबवत आहेत, यावर पुणे पोलिसांची करडी नजर आहे. प्रचारात पैशांचा गैरवापर, अवैध व्यवहार किंवा दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे का, याची सखोल तपासणी केली जात आहे. निवडणूक काळात कोणतीही बेकायदेशीर किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारी घटना घडल्यास संबंधित व्यक्ती उमेदवार असली तरी तिला कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स, व्हिडिओ आणि संदेशांवरही पोलिसांचे विशेष लक्ष आहे. द्वेषमूलक भाषण, धमक्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट्स आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीतील सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या निवडणूक लढवत असून, आयुष्य कोमकर हत्या प्रकरणातील कट रचल्याच्या आरोपाखाली त्या सध्या येरवडा कारागृहात आहेत. टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर देखील याच प्रकरणात अटकेत असून, पोलिस बंदोबस्तात आणि हातकड्या घालून त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आंदेकर कुटुंबावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. याच पक्षाकडून प्रभाग 39 मधून बापू नायरला उमेदवारी देण्यात आली असून, त्याच्यावर हत्या, अपहरण आणि खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
भाजपकडूनही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप आहे. कुख्यात गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यापूर्वीही निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. तसेच, रोहिदास चोरघे यांची पत्नी प्रतिभा चोरघे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. रोहिदास चोरघेवर हत्या, अपहरण, पोलिसांवर हल्ला आणि गोळीबाराचे गंभीर गुन्हे दाखल असून, संदीप बांदल हत्या प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते.
पुणे शहरातील २०२५ मधील गुन्हेगारी वास्तव आणि पोलिस आयुक्तांचे धडाकेबाज निर्णय…
पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…
पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…
पुणे शहरात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना १२ तासाच्या आत जेरबंद…

