कोंढवा पोलिसांकडून दुचाकी चोरास अटक; पाहा दुचाकींचे क्रमांक…
पुणेः कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत रस्त्यावर पार्क केलेल्या गाडया चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत वाढलेल्या वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करुन अचानक वाहन तपासणी करुन चोरीच्या वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा पोलिस निरीक्षक दिनेश पाटील, पोलिस अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, सुहास मोरे, राहुल थोरात, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, विकास मरगळे, शशांक खाडे, आशिष गरुड, रोहित पाटील, राहुल रासगे असे गुप्त बातमीदारा मार्फतीने, रहदारीच्या ठिकाणी अचानक वाहन तपासणी करत होते.
अल्पवयीन मुले गाडी चालवत आहे, त्यांना तपासून वाहने चेक करुन चोरीच्या वाहनाचा शोध घेत असताना ०७/११/२०२३ रोजी आशिर्वाद चौकात पोलिस अंमलदार सुहास मोरे, राहुल थोरात, जयदेव भोसले, विकास मरगळे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक ग्रे रंगाचे जर्किग घातलेला व्यक्ती हा खडी मशीन चौकातील चहाच्या टपरीच्या शेजारी थांबलेला आहे. त्याच्याकडे असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मोटार सायकल वर नंबर प्लेट नसून सदर मोटार सायकल विकण्यासाठी तो ग्राहक शोधत असून गाडीची कागदपत्र नंतर देतो असे सांगत आहे. त्याच्याकडे असणारी मोटार सायकल ही चोरीची असल्याचा संशय आहे. स्टाफसह त्यास पकडण्याकरिता गेलो असता तो वॉल कंपाऊंन्ड वरुन उडी मारुन पळून जावू लागला. स्टाफच्या मदतीने पकडून त्यास ताब्यात घेतले. अमन अलीम शेख (वय २५ वर्षे, रा. नवाजिश पार्क, कुबा मस्जिदच्या जवळ, मदिना मजिल बिल्डींग, कोंढवा खु. पुणे) असे त्याचे नाव आहे.
आरोपीकडे असणाऱ्या अॅटिव्हा मोटार सायकल बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवू लागला. तेव्हा त्यास पोलिस ठाणेस आणुन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याच्याकडे मिळून आलेली गाडी ही कोंढवा पोलिस ठाणे पुणे येथे गुरन.११३१/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल असणाऱ्या गुन्हयातील चोरी गेली असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हा रेकार्डवरिल वाहन चोरी करणारा आरोपी असल्याने त्याच्याकडे सखोल तपास करुन त्याच्याकडून
१) एम.एच.१२/ एल.आर. / ७८५१ होन्डा अॅक्टीव्हा मोपेड
२) एम.एच.१२टी.एन.०७५६ अॅक्टिव्हा
३) एम. एच. १२ बी. क्यु. ०३२२ अॅक्टिव्हा
४) एम. एच. १२ जी. जी. ४३५० अॅक्टिव्हा
५) एम.एच.१२ ई. एक्स. २१२१ यमाहा अश्या १,५०,०००/- रु किमंतीच्या एकुण ०५ चोरीच्या मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न करुन पुढीलप्रमाणे गुन्हे उघड झाले आहे.
१) कोंढवा पोलिस ठाणे पुणे गुरन. ११३१/२०२३ भादवि कलम ३७९
२) कोंढवा पोलिस ठाणे पुणे गुरन. ११३४/२०२३ भादवि कलम ३७९,
३) कोंढवा पोलिस ठाणे पुणे गुरन. ११४०/२०२३ भादवि कलम ३७९
४) लष्कर ठाणे पुणे गुरन.२५८/२०२३ भादवि कलम ३७९
५) लष्कर ठाणे पुणे गुरन. २२९ / २०२३ भादवि कलम.३७९
संबंधित कामगिरी ही पोलिस आयुक्त रितेशकुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, रंजन शर्मा अपर पोलिस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, विक्रांत देखमुख, पोलिस उप आयुक्त परि.०५, शाहुराव साळवे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संदिप भोसले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) व संजय मोगले पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे करण्यात आली आहे.
कोंढवा पोलिसांनी गंभीर गुन्हयातील फरारी आरोपींना केले जेरबंद…
कोंढवा पोलिसांच्या सापळ्यात अडकला पाहिजे असलेला आरोपी…
कोंढवा पोलिसांनी आरोपीकडून चोरीची चारचाकी, दुचाकी, मोबाईल केले जप्त…
कोंढवा पोलिसांनी 2 तासांत हत्यारासह आरोपींना केले जेरबंद…
गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी चोरले तब्बल १५ मोबाईल अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!