विमानाने पुण्यात येवून घरफोडी करणारे जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): दिल्ली येथून विमानाने पुण्यात येवून घरफोडी करणाऱ्या आरोपींना कोंढवा तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिल्ली येथे जावून चोरीस गेलेले १,६०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

दिनांक १३/०७/२०२३ रोजी दुपारी १४:३० वा ते १५:४५ वा चे दरम्यान फिर्यादी रविंद्र हनुमंत बटरके (वय ५० वर्षे, धंदा व्यवसाय, रा. फ्लॅट नं ११, धनलक्ष्मी कॉर्नर बिल्डींग, क्रांती चौक, कोंढवा बु., पुणे) यांचे तसेच फिर्यादी यांचे घरा समोर राहणारे किरण अविनाश होळकर यांचे राहते घर कुलूप लावून बंद असताना कोणीतरी अज्ञाताने त्यांचे राहते घराचे दरवजाचा कोयंडा कशाचेतरी सहाय्याने तोडून फिर्यादी यांचे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करून नेलेबाबत कोंढवा पोस्टे पुणे शहर येथे गु.र.नं. ७१६/२०२३ भादंवि कलम ४५४,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिनांक १०/०८/२०२३ सदरचा गुन्हा घडल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले व संदिप भोसले, पोलिस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलिस ठाणे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला. तपास पथकातील पोलिस अंमलदार पो.अं. / १०११६ ज्ञानेश्वर भोसले व पो. अं./४८४५ अनिल बनकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ‘दोन जण गोकुळनगर येथील रहिवासी भागामध्ये संशयीतरित्या टेहाळणी करीत फिरत आहेत. तसेच ते वॉचमन नसलेल्या सोयायट्यामध्ये सुद्धा जावून पाहणी करीत आहेत.’ अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांना सदरबाबत माहिती दिली व मदत पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील इतर सहकायांना घेवून सदर ठिकाणी गेले.

दोघांना पोलिस स्टाफच्या मादतीने ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) रिझवान अजमत अली (वय ३२ वर्षे, धंदा चालक, रा घर नं ५४८, राजिवनगर, भलस्वा डेअरी, लिबासपुर, दिल्ली), व २) ईकरार नसीर अहमद (वय २७ वर्षे, धंदा वेल्डींग काम, रा मु.पो. सैद नेगली, ता. हसनपुर, जि. अमरोहा, राज्य उत्तर प्रदेश) असे असल्याचे सांगितले. दोघांना सदर ठिकाणी येण्याचे कारण विचारले असता ते उडवा उडवीची उत्तरे देवू लागल्याने त्यांच्याकडे असलेल्या बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये त्यांचे वापरते कपडे दिसून आले कपड्यांच्या खाली एक हिरव्या रंगाची प्लॅस्टीकची मुठ असलेला स्क्रु ड्रायव्हर व एक लहान आकाराचे कटर मिळून आले. त्यांना सदर साहित्य कशाकरीता जवळ बाळगले याबाबत विचारणा केली असता समाधानकाराण उत्तरे न दिल्याने त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे मान्य केल्याने त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करून दिल्ली येथे जावून चोरीस गेलेले १,६०,०००/- रूकिं चे सोन्याचे दागिने जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

संबंधित कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, विक्रांत देशमुख, पोलिस उप-आयुक्त साो. परिमंडळ – ५, शाहूराजे साळवे, सहा पोलिस आयुक्त, वानवडी विभाग संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन, संदीप भोसले, पोलिस निरीक्षक संजय मोगले, पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलिस हवालदार/ ११६१ सतिश चव्हाण, पोलिस हवालदार/ ७९ निलेश देसाई, पोलिस नाईक / ८४८६ गोरखनाथ चिनके, पोलिस नाईक / ७७८२ जोतिबा पवार, पोलिस अंमलदार/८५९१ लक्ष्मण होळकर, पोलिस अंमलदार / ९८३८ संतोष बनसुडे, पोलिस अंमलदार/२१८५ सुजित मदन, पोलिस अंमलदार/४९० सुरज शुक्ला, व पो. अं. / ४८४५ अनिल बनकर, पोलिस अंमलदार/ १०११६ ज्ञानेश्वर भोसले यांच्या पथकाने केली आहे.

एम. एम. गँगचा म्होरक्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…

I-Phone, I-Pad, Smart Watch चोरणाऱ्यांना युनिट -2 ने केले जेरबंद…

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…

पुणे शहरात खुनाचा प्रयत्न करणारे पाच अटकेत; पाहा नावे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!