बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून चाकूने सपासप वार करून हत्या…
गोंदिया : आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयातून एकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कुडवा येथे मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी आरोपी भावासह त्याच्या एक साथीदाराला पोलिसांनी अटक करण्यात केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.
गोंदिया शहरापासून जवळच असलेल्या कुडवा येथील गोंडीटोला रोड चौक परिसरामध्ये रविवारी (ता. 26) मध्यरात्री घडली आहे. प्रज्वल मेश्राम (वय २०) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रज्वल मेश्राम याचे संकेत बोरकर याच्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. आरोपी संकेतने प्रथम आपल्या बहिणीला समज देऊन प्रज्वलपासून दूर राहण्याचे सांगितले होते. तसेच प्रज्वलला देखील माझ्या बहिणीशी बोलू नकोस, तीच्यापासून लांब राहा असे अनेक वेळा बजावले होते. मात्र प्रज्वल याने याकडे दुर्लक्ष केले आणि या दोघांतील वाद अधिक विकोपाला गेला.
आरोपी संकेत याने प्रज्वल याला माझ्या बहिणीशी प्रेमसंबंध ठेवू नकोस या बाबत अनेकवेळा धमकावले होते. मात्र प्रज्वल याने संकेतच्या या धमक्यांकडे लक्ष दिले नाही. अखेर संकेतने प्रज्वलचा काटा काढण्याचा कट रचला. आरोपी संकेत याने रात्री 2 वाजताच्या सुमारास आपल्या मित्राच्या मदतीने प्रज्वलला रस्त्यात गाठले आणि त्यावर चाकूने सपासप वार करून ठार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रज्वलचा जागीच मृत्यू झाला. सदर थरारक घटनेची माहिती रामनगर पोलिसांना होताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला. त्यानंतर या प्रकरणी संकेत बोरकर आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. संकेत बोरकर याचा एक साथीदार जखमी असल्याने त्याला नागपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.
धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…
प्रेम प्रकरणाच्या वादातून युवकावर केले सपासप चाकूने वार…
दोन भावांचा एकाच महिलेवर जडले प्रेम अन् पुढे…
भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…
चुलतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती चुलत्याला समजली अन्…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!