गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल…
अहमदनगर: नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगर मधील तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे कार्यक्रम घेतल्याबद्दल नगरमधील गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजर विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर शहरातील पाईपलाईन रोडवर गुरूवारी (ता. २८) सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र तरीही हा कार्यक्रम घेतल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटील, तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात आणि कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत, यांच्यावर तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये रस्त्यात अडथळा निर्माण होईल असा कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवी कलम 188,283,341, 34 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 2,15 आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 चे कलम 3,4 5, 6 आणि मु.पो.का.क 37 (1) (3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, तोफखाना पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. मात्र तरीही गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेण्यात आला. गौतमीला पाहण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गणेश विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी मृत्युंजय युवा प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे पोलिसांचा धाक राहिला की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. शिवाय, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. अखेर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गौतमी पाटील हिच्या वडिलांचे उपचारादरम्यान निधन…
… तर मी कार्यक्रम करणं खरंच बंद करेन : गौतमी पाटील
गौतमी पाटील म्हणाली, माझ्या आडनावावर कार्यक्रमावर आक्षेप असेल तर…