
बीड! सरकारी वकिलाने न्यायालयातच घेतला गळफास; मोठा ट्विस्ट…
बीड: वडवणी येथील न्यायालयात सत्काराच्या शालनेच गळफास घेत सरकारी वकिलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या सरकारी वकील व्ही.एल. चंदेल यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
चंदेल कुटुंबीयांनी म्हटले आहे की, ‘व्ही.एल. चंदेल यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता, त्यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी आम्हाला दाखवली नाही. त्या चिठ्ठीत नेमका काय उल्लेख आहे, तो आम्हाला माहिती नाही. परंतु, जे कुणी यात दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या संपूर्ण आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.’
दरम्यान, वडवणी पोलिसांनीही चिठ्ठी मिळाल्याचा दुजोरा दिला आहे. मात्र, चिठ्ठीसंदर्भात आत्ताच माहिती देता येणार नाही, असे म्हटल्याने चंदेल यांच्या मृत्यू गूढ आणखी वाढले आहे. चंदेल हे स्वभावाने अतिशय चांगले आणि मनमिळाऊ होते, ते असे काही करणार नाहीत, त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता असे त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते. त्यामुळे सरकारकडून याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. व्ही.एल. चंदेल यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांच्या मागणीनंतर मोठा ट्विस्ट आला आहे.
पोलिस अधिकारी API अश्विनी बिद्रे प्रकरणी न्यायालयाने सुनावली दोषींना शिक्षा…
कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाने दिले आदेश…
मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video…
साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

