पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…

पुणे : नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथे आज (मंगळवार) सकाळी घडली आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या मांडवातून वाजत-गाजत वऱ्हाड जाणार होतं, आता तिथूनच नवरदेवाची अंत्ययात्रा निघाल्यामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

सूरज रायकर (वय २८) याचा आज देहूगावात विवाह सोहळा पार पडणार होता. लग्नाची सगळी तयारी झाली होती. तळेगावातील राहत्या घरासमोर मांडव ही टाकण्यात आला होता. याच मांडवातून आज सकाळी सुरजचं वऱ्हाड वाजत-गाजत जाणार होतं. सोमवारच्या रात्री या आनंदात सगळे झोपी गेले होते. सूरजने कोणाला काहीही न सांगता, पहाटे साडे चार वाजता घर सोडले होते. कुटुंबियांची लग्नाची तयारी सुरू होती.

भाचा सुरजने मामाला एक मेसेज त्यांना पाठवला होता. “मला हे लग्न करायचं नाही, मी आत्महत्या करत आहे.’ असे त्यात नमूद असल्याचे पाहताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. मग सर्वानी परिसरात सूरजला शोधण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा घरापासून काही अंतरावर असणाऱ्या विहिरीजवळ गाडी अन काही वस्तू आढळल्या. यावरून सुरजने विहिरीत उडी मारली असेल, असा अंदाज बांधण्यात आला. नवरी मुलीच्या घरचे देहूगावातील लग्नस्थळी वऱ्हाड घेऊन निघण्याच्या तयारीत होते. तितक्यात सुरजच्या कुटुंबीयांनी घडला प्रसंग त्यांच्या कानावर टाकला आणि आम्ही पुढची घडामोड कळवेपर्यंत वऱ्हाड काढू नये, असे मुलीच्या कुटुंबियांना कळविण्यात आले.

तळेगाव पोलिसांना याबाबतीतची माहिती देण्यात आली. त्यांनी मावळ वन्यजीव रक्षक पथकाला पाचारण केले. त्यांनी विहिरीतील अशुद्ध पाणी बाहेर काढायला सुरुवात केली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुरजचा मृतदेह आढळला. नवरी मुलीच्या कुटुंबियांना ही बाब कळविण्यात आली. या घटनेने दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वऱ्हाडी मंडळींना मोठा धक्का बसला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…

पुणे शहरातील पोलिसकाकाची गोळी झाडून आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!