
सैराट! प्रेमसंबंधातून युवतीच्या प्रियकराला घातल्या गोळ्या…
पुणे : पिंपरीमध्ये प्रेमसंबंधातून सुपारी देऊन नातेवाईक असलेल्या युवतीच्या प्रियकराला गोळ्या घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात विकास बाळासाहेब केदारी (३१, रा. ताजे, मळवली, ता. मावळ) हा जखमी झाला असून, त्याच्यावरती रूग्णायात उपचार सुरू आहेत. ‘सैराट’ चित्रपटाप्रमाणेच घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
अभिजित संतोष केदारी (वय २६), नितीन ज्ञानदेव केदारी (४२, दोघेही रा. ताजे, ता. मावळ) आणि आकाश अण्णा भोकसे (२६, रा. कुरकुंडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विकास यांचा भाऊ किरण यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune Crime News)
विकासचे संशयित अभिजित याच्या नातेवाईक असलेल्या युवतीसोबत प्रेमसंबंध आहेत. याचा राग असल्याने अभिजितने नितीन केदारी आणि आकाश भोकसे यांना विकासला मारण्याची सुपारी दिली. मावळ तालुक्यातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत ओझर्डे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी (ता. ११) रात्री साडदेहाच्या सुमारास नितीन आणि आकाशने विकासला रस्त्यात अडवले आणि नितीनने त्याच्या मानेवर पिस्तुलातून गोळी झाडली. ती आरपार गेल्याने विकास रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर संशयित पळून गेले. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी विकासला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विकासच्या भावाने फिर्यादीत अभिजित केदारीवर संशय व्यक्त केला होता.
दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस तातडीने धाव घेतली. पोलिसांनी संशयितांची माहिती मिळाल्यानंतर तिघांना ताब्यात घेतले. अभिजितला रायगड जिल्ह्यातील माथेरान येथून, तर नितीन केदारी आणि आकाश भोकसेला सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील मांढरदेवी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…
पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…
पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार…
प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

