मुंबई-पुणे मार्गावरील पुलावरून मोटार पडली रेल्वेवर; तिघांचा मृत्यू…

मुंबई : मुंबई-पुणे चौपदरी मार्गावरून जाणारी एक मोटार पुलावरुन खाली पडली आणि पुलाखालून जाणाऱ्या मालगाडीवर आदळली. यावेळी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे 3 ते 4 वाजताच्या दरम्यान गाडी मुंबई-पनवेल चौपदरी मार्गावरून नेरळकडे जात असताना ही घटना घडली. धर्मानंद गायकवाड (वय 41) आणि त्यांचे चुलत भाऊ मंगेश जाधव (वय 46) आणि नितीन जाधव (वय 48) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

कर्जत आणि पनवेल रेल्वे स्थानकांदरम्यानच्या पुलावरून एक कार चालत्या मालगाडीवर पडली, त्यात तीन जण ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. मृत धर्मानंद गायकवाड हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले गट) कार्यकर्ता होते. आरपीआयचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अपघाताबाबत मध्य रेल्वेचे (सीआर) जनसंपर्क संचालक डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, ‘मालगाडी पनवेलहून रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या दिशेने जात होती आणि या घटनेमुळे तिचे काही डब्बे वेगळे झाले होते. अपघातामुळे सीआर हायवेचा पनवेल-कर्जत रस्ता पहाटे 3 ते सकाळी 7.32 पर्यंत बंद होता. या घटनेमुळे कर्जत-कल्याण मार्गावरून फक्त हुबळी-दादर एक्स्प्रेस (17317) वळवण्यात आली होती.’

बीडमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेतील चौघांचा तर ट्रॅव्हल्समधील सहा जणांचा मृत्यू…

पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू…

शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या तीन बसचा भीषण अपघात…

दसऱ्याच्या दिवशी मोटार अपघातात कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!