
संगमनेर कारागृहातून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी गज कापून पळाले…
संगमनेर (अहमदनगर): संगमनेर कारागृहातून चार कैदी पळून गेल्याची घटना आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास घडली आहे. पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
संगमनेर तहसील कार्यालय परिसरात संगमनेर शहर पोलिस ठाणे तसेच इतरही अनेक शासकीय कार्यालये आहेत. शहर पोलिस ठाण्याला लागूनच कारागृह आहे. या कारागृहाचे गज कापून चार कैदी पळून गेले. पळून गेलेल्या चौघांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेले हे आरोपी आहेत. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.
ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…
कारागृहातील नवऱ्याच्या कैदी मित्राच्या प्रेमात पडली पत्नी अन् पुढे…
अमिताभ गुप्ता यांची संकल्पना! येरवड्यातील कैदी उपहागृहात बनवणार विविध पदार्थ…
येरवडा कारागृहातील बंद्यांनी सलग दुसऱ्यांदा मिळवला राष्ट्रीय विजेते पदाचा मान!
येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…
कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!