पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पुणे : ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना वानवडी भागातील बी. टी. कवडे रोडवर घडली आहे. सराफा व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून, गोळीबार करणाऱ्यांनी व्यावसायिकाकडील सोनं लुटून नेले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रतिक मदनलाल ओसवाल (वय 35) असे गोळीबारात गंभीर झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडिलांसोबत दुचाकीवरील जाणाऱ्या सराफ व्यावसायिकावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रतिक ओसवाल आणि त्याचे वडील दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी क्रोम मॉल चौकापासून बी. टी. कवडे रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी (ता. ८) रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी दुचाकीवरून आलेल्या 3 जणांनी प्रतिकवर 3 गोळ्या झाडल्या. यावेळी प्रतिकच्या तोंडावर आणि मांडीत गोळी लागली आहे. यामध्ये प्रतीक गंभीर जखमी झाला आहे. जखमी प्रतिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे. दरम्यान हा गोळीबार नेमका कोणी आणि कोणत्या कारणारून करण्यात आला हे मात्र समजू शकलेले नाही. प्रतिक आणि त्याचे वडील सोने घेऊन निघाले होते. गोळीबार करणाऱ्यांनी ते सोने घेऊन गेल्याचे प्रथमदर्शी नागरिकांनी सांगितले. वानवडी पोलिस आणि गुन्हे शाखेने पुढील तपास सुरू केला आहे.

पुणे शहरात गरोदर असल्याचे सांगून युवकाकडे मागितली खंडणी…

पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…

पुणे शहरात युवकाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

पुणे शहरात गोळीबार करून खून करणाऱ्या तिघांना युनिट १ने घेतले ताब्यात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!