पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…

पुणे : एक ज्येष्ठ नागरिक कॉल गर्लला भेटल्यानंतर पोलिसांच्या कारवाईची भीती दाखवून तब्बल ३० लाख रुपयांना लुबाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी ३० लाख रुपयांना लुबाडल्यानंतर दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

ज्येष्ठ नागरिकाने ज्योती नावाच्या महिलेमार्फत एका कॉल गर्लची भेट घेतली होती. ज्योती हिने ज्येष्ठ नागरिकाला फोन करून कॉल गर्लला पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असून तिच्या फोनमध्ये तुमच्या कॉलचे डिटेल्स आहेत. त्यामुळे पोलिस तुमचेही नाव त्यात घेतील अशी भीती ज्येष्ठ नागरिकाला घातली.

ज्येष्ठ नागरिकाला ब्लॅकमेल करत ज्येष्ठ नागरिकाकडून आरोपींनी रोख रक्कम आणि चेकद्वारे ३० लाख ३० हजार रुपये घेतले. या प्रकरणी पोलिसांनी ज्योती बनसोडे आणि रामचंद्र बापू कोरडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी ३० लाखांना लुबाडल्यानंतरही ज्येष्ठ नागरिकाकडे खंडणी मागितली. पाच लाख रुपये आणि दर महिन्याला एक लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे दिले नाही तर पोलिस कारवाई करतील अशी धमकीही देण्यात आली. आरोपींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेवटी ज्येष्ठ नागरिकाने कुटुंबाला याबाबत माहिती देत तक्रार दाखल केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

मोबाईलवर बनावट स्क्रीनशॉट दाखवून बंटी-बबली करायचे फसवणूक…

पुणे शहरात फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून मोठी फसवणूक…

शिक्षिकेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!