IT मॅनेजरनं Live Video करत छळाला कंटाळून संपवलं आयुष्य…

लखनौ (उत्तर प्रदेश): TCS रिक्रूटमेंट मॅनेजरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘माफ करा आई आणि बाबा. मी माझ्या पत्नीला कंटाळलो आहे. कृपया कोणीतरी पुरुषांबद्दल बोला, ते खूप एकाकी होतात. बायको मला धमकावते, असे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ हा 6.57 मिनिटांचा 24 फेब्रुवारीचा आहे. अग्रा येथील मृत युवकाच्या वडिलांनी सीएम पोर्टलवर तक्रार केली आहे.

डिफेन्स कॉलनी येथे राहणारा मानव शर्मा हा मुंबईतील टीसीएसमध्ये रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. एअरफोर्समधून निवृत्त झालेले वडील नरेंद्र शर्मा म्हणाले की, ‘मुलाचे लग्न 30 जानेवारी 2024 रोजी बर्हानशी झाले होते. यानंतर सूनही आपल्या मुलाकडे राहण्यासाठी मुंबईला गेली होती. दोघांचे काही दिवस चांगले गेले, पण त्यानंतर सून रोज भांडू लागली. कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या धमक्या देऊ लागली. सून प्रियकरासोबत राहण्याबाबत बोलू लागली.

सून आणि मुलगा मुंबईहून 23 फेब्रुवारी रोजी घरी आले. त्याच दिवशी मानव पत्नीला सोडण्यासाठी माहेरी गेला होता. तेथे मानवला त्याच्या सासरच्या मंडळींनी धमकावले होते. दुसऱ्या दिवशी (ता. 24) पहाटे पाच वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आम्ही त्याला लष्करी रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. 26 फेब्रुवारी रोजी मी तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात गेलो. तेथील पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला. अधिकारी महाशिवरात्रीच्या ड्युटीवर असल्याचे सांगितले. मी घरी परतलो. त्यानंतर मी सीएम पोर्टलवर तक्रार पत्र लिहिले, असे मानव शर्मा याच्या वडिलांनी म्हटले आहे.

मानव याने व्हिडिओमध्ये म्हटेल की, ‘मी जाईन. पुरुषांबद्दल विचार करा, कृपया विचार करा, कोणीतरी पुरुषांबद्दल बोलले पाहिजे. गरीब माणूस खूप एकटा आहे. पप्पा सॉरी, मम्मी सॉरी, अक्कू सॉरी. मी निघून गेल्यावर सर्व काही ठीक होईल. यानंतर तो रडू लागतो. शेवटच्या क्षणी हसून करायचंच असेल तर नीट कर, असं म्हणतो. अश्रू पुसत तो म्हणतो, “माझ्या पालकांना हात लावू नका.’ पोलिस निरीक्षक वीरेश पाल गिरी यांनी सांगितले की, ‘कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दिली नाही. गुरुवारी रात्री उशिरा व्हॉट्सॲपवर ही तक्रार आली. यावरूनच गुन्हा दाखल करण्यात येत आहे.’

दरम्यान, बेंगळुरू येथील एआय अभियंता अतुल सुभाष यांनी 9 डिसेंबर रोजी फ्लॅटमध्ये सुसाईड नोट आणि व्हिडिओ बनवून आत्महत्या केली होती. यानंतर अतुलच्या कुटुंबीयांनी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबीयांवर अतुलला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.

TCS मॅनेजर सुरभी जैन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा…

हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…

पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिला कृष्णाने स्माईल दिली अन्…

तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष मोरे यांनी हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून केली आत्महत्या…

धक्कादायक! मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांची आत्महत्या…

धक्कादायक! मुंबईत पायलट युवतीने केली आत्महत्या; प्रियकर ताब्यात…

नाशिकमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!