
मनोज जरांगे यांचे सहकारी पोलिसांच्या ताब्यात; संचारबंदी, बस पेटवली, इंटरनेट बंद…
जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री पासून ही संचारबंदी लागू केली गेली आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याच्या इशाऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा होणार आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे.
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीत बस पेटवण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईला देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जाण्यासाठी तयारी करत असतानाच पहाटे 4 वाजता या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
अंबड तालुक्यात संचरबंदी लागू केल्याने पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. भांबेरीत मोठ्या संख्येनं पोलिस दाखल झाले आहेत. पोलिस बळाचा वापर करणार नाही, मराठा आंदोलकांनी सहकार्य करण्याची पोलिसांनी विनंती केली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे मुंबईला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणार यावर ठाम आहेत. आजच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. फडणवीस यांच्याविरोधात प्रचंडा नाराजीची लाट उसळळी आहे. फडणवीसांशिवाय जिल्हाधिकारी संचारबंदीचा आदेश काढू शकत नाहीत. आंदोलकांनी संयाने आंदोलन करावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीत बस पेटवण्यात आली आहे. मराठा आंदोलकांची धरपकड केल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. जरांगे यांच्या सहकाऱ्यांसह ७ जणांना ताब्यात घेतले आहे. यानंतर जालना जिल्ह्यातल्या तीर्थपुरीत मराठा आंदोलकांनी बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे. जरांगे पाटील यांचे सहकारी शैलेंद्र पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.
मराठा आंदोलन आक्रमक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बीडमधून छत्रपती संभाजी नगर व जालना मार्गे जाणारी बस सेवा बंद करण्याचा निर्णय बीड आगाराने घेतला आहे. मध्यरात्रीपासूनच बसच्या फेऱ्या बंद केले आहेत. पोलिस प्रशासनाच्या सूचनेवरून एसटी बस विभागाने हा निर्णय घेतला. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला.खबरदारीचा उपाय म्हणून रापमच्या बीड विभागाने रात्री पासूनच छत्रपती संभाजीनगर, जालना या मार्गे जाणाऱ्या बस अचानक रद्द केल्या आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे हे रविवारी अंतरवाली सराटीहून निघाल्यानंतर रात्री भांबेरी गावामध्ये थांबले होते. त्यांच्यासोबतच्या 6 ते 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जालना पोलिसांनी पहाटे 3 वाजता ही कारवाई केली आहे. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत जरांगे पाटील यांच्या कोर टीममधील समर्थक ताब्यात घेतले असल्याचे समोर येत आहे.
नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल…
Video: पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषिक : देवेंद्र फडणवीस
भाजप नेत्याची गाडी अडवल्याची पोलिसकाकाला शिक्षा…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

