धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…

पुणे (संकेत निंबाळकर) : भारती विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसतीगृहातील कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला तसेच आपल्या रुममेटच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचचलल्याची माहिती पुढे आली आहे. 7 मार्च रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर या विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत मात्र महाविद्यालय प्रशासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मिळालेल्या रेणुका बालाजी साळुंखे (वय 19) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींचे नाव आहे. या विद्यार्थिनीच्या कथित आत्महत्येप्रकरणी वसतीगृहाच्या उपहारगृहात काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि वसतीगृहातचराहणारी मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू (वय 19) या विद्यार्थिनीविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी धोंडीबा साळुंखे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

दाखल तक्रारीनुसार, मृत विद्यार्थिनी ही बालाजी साळुंखे यांची मुलगी आहे. ती भारतीय विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत होती. याच वसतीगृहात काम करणारा सतिश जाधव नावाचा कर्मचारी रेणुकाला ‘आय लव्ह यू’ म्हणजेच माझे तुझ्यावर प्रेम आहे, अशा प्रकारचे मेसेज सतत पाठवायचा. मृत विद्यार्थिनी समोर दिसताच ‘तू इतकी बिझी झालीस का? मी किती मेसेज केले,’ असे म्हणत सतिश तिला त्रास द्यायचा. या प्रकारामुळे रेणूका घाबरली होती. यासह तिच्या खोलीत राहणारी मुस्कान सिद्धू नावाची मुलगीही तिला अभ्यास करू देत नव्हती. ती सतत खोलीचे लाईट्स बंद करायची.

या दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेणुकाने अखेर वसतीगृहातील स्वच्छतागृहात ७ मार्चच्या रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्वतःला पेटवून घेतले होते. पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार चालू होते. उपचार चालू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

पुणे: ‘मुळशी पॅटर्न’मधील पिट्या भाईंनी युवतींचा धक्कादायक Video आणला समोर…

धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून…

धक्कादायक! पोलिस भरतीच्या तयारीसाठी अकॅडमीत गेलेल्या युवतीची आत्महत्या…

माझ्या सोबत रिलेशन मध्ये राहणार का नाही? म्हणणारा जेरबंद…

पुणे महानगरपालिकेजवळ महिलेचा विनयभंग करणारा ताब्यात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!