दसऱ्याच्या दिवशी मोटार अपघातात कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू…

रांची (झारखंड) : देशभर आज (मंगळवार) दसरा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा होत असताना एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. देवघर येथे बोलेरो कार उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कार उलटून ६० फूट खोल गेली.

झारखंडमधील देवघरमध्ये आज सकाळी विचित्र अपघात झाला. सिकतिया बॅरेजमध्ये बोलेरो उलटली आणि ६० फूट खोल गेली. यावेळी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. कुटुंबातील सर्वजण गिरिडीहहून आसनसोलला जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यावेळी हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच चित्रा पोलिस ठाण्याचे प्रभारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पथकाने सर्व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.

आसनसोलहून गिरीडीह येथील बनसडीहकडे येत असताना देवघर येथील सिक्टाया बॅरेज येथे बोलेरो पूल खाली पडली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुलाचे विधी आटोपून हे कुटुंब सासरच्या घरून गिरीडीह येथील घरी परतत होते, असे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान हा अपघात झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…

मुंबई-गोवा महामार्गावर मोटार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!