पोलिस दलाची मोठी कारवाई; दहा माओवाद्यांना कंठस्नान…

रांची (छत्तीसगड) : सुकमा जिल्ह्यात माओवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत दहा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिस दलाला यश आले आहे. या कारवाईत तीन माओवाद्यांचे मृतदेह एसएलआर एके 47 सारख्या अत्याधुनिक बंदुकांचा साठा जप्त करण्यात आले आहे.

सुकमा जिल्ह्यात ओरिसा तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या भेजीच्या छत्तीसगडच्या हद्दीत ही चकमक झाली. चकमकीत पोलिसांनी दहा माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मुळचे कोल्हापूर निवासी आणि सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टीम भेजीच छत्तीसगढच्या हद्दीत पोहोचली होती. या ठिकाणी पोलिसांची माओवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी दहा माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यामधील तीन माओवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर घटनास्थळावरून एसएलआर एके 47 सारख्या अत्याधुनिक बंदुकांचा साठा जप्त करण्यात आले आहे. तसेच या चकमकीनंतर माओवाद्यांच्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्याचसोबत या चकमकीत कोणताही पोलिस जखमी झाला नाही आहे. त्यामुळे पोलिसांनी यशस्वीरित्या हे ऑपरेशन राबवले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बदला! 14 वर्षांनंतर तोच दिवस अन् तीच वेळ…

दोन कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्यांच्या बड्या नेत्याला अटक…

Video: जवानाचा मृतदेह मिळाला तब्बल ५६ वर्षांनी…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!