गणेशोत्सवासाठी राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांची बैठक…

मुंबई : गणेश उत्सव 2023 बाबत राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (ता. 5 ) विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले.

गणेशोत्सवादरम्यान महामार्गावर काय करता येईल आणि कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत बैठकीत चर्चा झाली. विविध ठिकाणी सुविधा केंद्र तयार केले जातील, जिथे माता आपल्या मुलांना आहार देऊ शकतील, वैद्यकीय मदत आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, तसेच कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी अंधार असलेल्या ठिकाणी दिवे आणि सूचना फलक लावले जातील, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्राच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांनी या बैठकीविषयी माहिती दिली. गणेशोत्सव हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणातील आपल्या मूळगावी जातात. या आठवड्यापासून चाकरमानी गावी जाण्यास सुरुवात करतील. वाहनचालकांसाठी एक कॉरिडॉर उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व प्रयत्न प्रशासनाकडून केले जाणार आहेत.

सणासुदीत कोकणात बसद्वारे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. या बसेसचे मार्ग कसे असतील आणि त्यावर काय उपाययोजना कराव्या लागतील यावर बैठकीत चर्चा झाली. महामार्ग पोलीस त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत अपडेट्स पोस्ट करतील. तसेच त्यांनी भाविक आणि वाहनधारकांना वाहने चालवताना सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, यंदा गणपती बाप्पांचे 19 सप्टेंबर 2023 रोजी आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ देखील सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान 3,100 जादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत होणार कंत्राटी पोलिसांची भरती; सरकारच्या निर्णयाला विरोध…

जालना जिल्ह्याचे शैलेश बलकवडे नवे पोलिस अधीक्षक; पदभार स्वीकारला…

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!