प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…

नवी दिल्लीः दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये एकाने डॉक्टर युवतीचा (वय २४) विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित युवतीच्या तक्रारीनंतर प्राध्यापक असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी प्राध्यापक रोहित श्रीवास्तव (वय 47) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथे राहणाऱ्या रोहित श्रीवास्तव आणि त्या मुलीची सीट बाजूबाजूला होती. बुधवारी (ता. 26) रोजी पहाटे 5.30 वाजता हे विमान दिल्लीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. विमान मुंबईत उतरण्यापूर्वीच आरोपीने मुलीचा विनभंग केला. आरोपीने चुकीच्या हेतून स्पर्श केल्याचे मुलीने म्हटले आहे. मुलीच्या ही गोष्ट लक्षात आली असता तिने त्या व्यक्तीस विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरु झाला. वाद जास्तच वाढल्यावर विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

विमानाच्या लँडिंगनंतर अधिकारी या दोघांनाही सहार पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेव्हा आरोपीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. तसेच या मुलीचा जबाबही पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली. त्यानंतर आरोपीला आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, सध्या आरोपीला जामीन मिळाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा नव्हता: खुशबू सुंदर

लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…

विमानतळ पोलिसांनी आंतरराज्यीय अट्टल वाहनचोरास केले गजाआड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!