जन्मदात्या मुलाने वडिलांची हत्या करून मृतदेह फेकला नदीत; पण…

परभणी : क्षुल्लक कारणावरून झालेला वादातून जन्मदात्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह परभणी जिल्ह्यातील इंद्रायणी नदी पात्रात फेकून दिला होता. परभणी पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र फिरवत मृत व्यक्तीची ओळख पटवून, हत्या करणाऱ्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. मुंजा एकनाथ कटारे असे मृत व्यक्तीचे नाव असून, अशोक मुंजा कटारे असे आरोपी मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दैठणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रात रविवारी एका पुरुषाचा अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृतदेह सडल्यामुळे परिसरात वास सुटला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटवितांना त्याच्या हातावर नाव गोंदलेले असल्याचे पोलिसांना कळाले. त्यामुळे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले असता मयत हा बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे कळाले.

मृत व्यक्तीची ओळख पटल्याने परभणी पोलिसांनी बीडच्या माजलगाव परिसरातील दिंद्रुड येथे जाऊन चौकशी केली असता मुंजा कटारे यांचा घातपात करून त्यांना दिंद्रुड परिसरात जिवे मारून मृतदेह दैठणा परिसरात फेकल्याची त्यांना माहिती मिळाली. मुलगा अशोक कटारे याचा सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी चौकशीत अशोक कटारे याने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात ठेवून वडिलांची हत्या केल्याचे सांगितले. हत्या केल्यावर संगम पाटी ते दिंद्रुड जाणाऱ्या रोडवर जिवे मारून त्यांचा मृतदेह दैठणा हद्दीतील नदी पात्रात फेकल्याचे देखील त्याने सांगितले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

साध्या वेशातील पोलिसांनी फ्रुटी वाटली अन् मास्क काढताच अडकले…

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…

सापावर पाय पडल्याच्या भीतीनंतर चिमुकल्याचा घाबरुन मृत्यू…

सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…

संतापजनक! चिमुकलीची हत्या करून मृतदेह कोंबला प्लॅस्टिकच्या बादलीत…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!