Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…

माद्रिद (स्पेन) : एका महिला पत्रकार लाईव्ह टीव्ही वर रिपोर्टिंग करत असताना युवकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. घटना लाईव्ह टीव्हीवर दिसली आणि रेकॉर्डींगही झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक महिला पत्रकार वार्तांकन होती. यावेळी एक युवकाने जवळ येत महिला पत्रकाराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आहे. संबंधित घटना टीव्हीवर पाहिल्यानंतर अनेकांनी संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना स्पेनमधील माद्रिद येथील असून ही घटना 12 सप्टेंबर रोजी घडली आहे. या व्हिडीओतील महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार इसा बालाडो चॅनल कुआट्रोसाठी माद्रिदमध्ये चोरीच्या घटनेसंदर्भात लाइव्ह रिपोर्टिंग करत होती. यावेळी पाठीमागून आलेल्या युवकाने पत्रकार इसाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यामुळे ती अस्वस्थ झाली आहे. संबंधित युवकाने महिलेला पाठी मागून स्पर्श केला आणि ती कोणत्या चॅनेसाठी काम करते, असे विचारले. पण, या घटनेनंतरही महिला पत्रकारांने वार्तांकन सुरू ठेवले.

संबंधित घटना पाहून स्टुडीओतून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा होस्टही आश्चर्यचकित झाला आणि त्याने महिला पत्रकाराला विचारले की, “तुझ्या बोलण्यात व्यत्यय आणल्याबद्दल माफी असावी. पण त्याने तुझ्या नितंबाला हात लावला का?” त्यावर महिला पत्रकार अस्वस्थ होऊन हो असं उत्तर देते. यावर अँकर संतापतो आणि म्हणतो की, ‘कृपया त्या माणसाला कॅमेरासमोर आण.’ ही संपूर्ण घटना लाईव्ह टीव्हीवर घडली.’

Video: पाकिस्तानमधील गरिबी; गाढवाला काय करावं लागतंय पाहा…

Video: चिमुकलीच्या अंगावरून तीन वाहनं गेली अन्…

Video:पाकमध्ये झिंदाबाद झिंदाबादचे नारे सुरू असतानाच झाला बॉम्बस्फोट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!