
धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाची तब्बल चार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांच्या टोळीतील एका महिलेला गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. या टोळीतील इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. सायबर पोलिसांची मागील काही महिन्यांतील ही मोठी कारवाई आहे.
सायबर चोरट्यांनी मागील फेब्रुवारी महिन्यात एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीच्या अकाउंटंटद्वारे चार कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी सायबर पोलिसांनी मागील फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता. सानिया ऊर्फ गुड्डीया महम्मद मुस्तकीम साहब सिद्दीकी (रा. गोपालगंज, बिहार) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरातील एक नामांकित बांधकाम व्यावसायिक मागील फेब्रुवारीमध्ये कामानिमित्त परदेशात गेले असताना सायबर चोरट्यांनी या बांधकाम व्यावसायिकाच्या अकाउंटंटला व्हॉट्सॲपवर संदेश पाठविला. ‘तुमचे मालक अडचणीत आहेत, तातडीने दिलेल्या बॅंक खात्यात पैसे पाठवा,’ असा तो संदेश होता. त्यावर अकाउंटंटने मालकाकडे खातरजमा न करता चोरट्यांनी दिलेल्या बॅंक खात्यात वेळोवेळी चार कोटी सहा लाख रुपये पाठविले. काही दिवसांनंतर बांधकाम व्यावसायिक भारतात परतल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत बांधकाम व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या टोळीतील आरोपी सानिया सिद्दीकीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून सायबर पोलिसांचे पथक काही महिन्यांपूर्वी राजस्थानमधील कोटामध्ये गेले होते. त्या वेळी पोलिसांना चकवा देऊन ती कोटा रेल्वे स्थानकावरून फरार झाली होती. या प्रकरणात सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सायबर पोलिसांचे पथक तिच्या मागावर होते. सानिया फरार झाल्यानंतर स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होती. सायबर पोलिसांच्या तपास पथकाला सानिया दिल्लीत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ, वरिष्ठ निरीक्षक सुरेश शिंदे, पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक संदीप कदम, पोलिस हवालदार सीमा सुडीत, नीलम साबळे, पोलिस अंमलदार संदीप पवार, सचिन शिंदे तत्काळ दिल्लीला रवाना झाले.
तपास पथकाने दिल्लीतील स्थानिक पोलिसांच्या मदतीने जामियानगर भागात सानियाचा शोध घेतला. परंतु, तपासादरम्यान पोलिस अंमलदार आश्विन कुमकर यांना सानिया बिहारमधील गोपालगंज भागात गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथकाने दिल्लीहून गोपालगंज गाठले. तेथे खबऱ्याच्या मदतीने सानियाचे घर शोधले. पोलिस आल्याचे समजताच ती घराच्या छतावरून उडी मारून पळून जाताना तिला पोलिसांनी ताब्यात घेतले.
सायबर पोलिस स्टेशन यांनी सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे (गुन्हे) पुणे शहर, पोलिस उप-आयुक्त विवेक मासाळ, आर्थिक व सायबर पुणे शहर, सहाय्यक पोलिस आयुक्त मच्छिंद्र खाडे, आर्थिक व सायबर पुणे, सुरेश शिंदे, वपोनि, सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वप्नाली शिंदे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन पुणे शहर, पोलिस उप-निरीक्षक संदिप कदम, पोहवा ६०७८ सिमा सुडीत, पोहवा ६२६८ निलम साबळे, पोहवा ९२१ मुंढे, पोहवा कोंडे, पोशि. ८४३९ संदिप पवार, पोशि ९९०७ सचिन शिंदे, पोशि. १०१०७ दिनेश मरकड, पोशि अश्विन कुमकर, पोशि १०७१६ नागटिळक, पोशि स्वागत पळसे यांनी सदरची कामगीरी केली आहे.

Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…
नवरदेवाने इन्स्टन्ट लोन कंपनीकडून पैसे घेतले पण एजंट्सनी पत्नीचे फोटो केले मॉर्फ अन्…
Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…
एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…
पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…
Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…
Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…
पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…
आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…
युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…
सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…
महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

