गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरल्याने युवकाचा मृत्यू…

कोल्हापूर : गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरुन पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आजरा तालुक्यातील बोलकेवाडी येथे घडली आहे. गणेश चतुर्थी दिवशी घडलेल्या या दु:खद घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सचिन शिवाजी सुतार असे मृत्यू झालेल्या गणेशभक्ताचे नाव आहे. सचिन सुतार हे आज (मंगळवार) सकाळी गणपती घेऊन घरी आले. घरात गणपती घेताना चौकटीला लागेल म्हणून ते खाली वाकले आणि पाय घसरून खाली पडले. डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मुंबई येथे सुतारकाम करून उदरनिर्वाह करणारे सचिन हे दोन दिवसापूर्वी गणेशोत्सवासाठी गावी आले होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

दरम्यान, राज्यभरात आज गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणूका काढल्या आहेत. यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांना लाईट इफेक्टसचा वापर करुन नये असा थेट इशारा दिला आहे. नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरेल अशा गोष्टी करुन नयेत, असे मंडळांना पोलिसांनी सांगितले आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

वर्दीतला गणपती बाप्पा! शिव ठाकरे याने थीम ठेवली ‘पोलिस’…

Video: गणपती वर्गणीच्या नावाखाली किरणा दुकानदाराच्या लावली कानाखाली…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!