जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची हत्या…

पुणेः जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे  यांची जमिनीच्या वादातून अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली असून, हत्येनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरु केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानसरे यांचा काही लोकांशी जमिनीचा वाद सुरु होता. या कारणावरुन शुक्रवारी (ता. 7) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. ज्यामध्ये पानसरे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मेहबूब पानसरे हे खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

मेहबूब पानसरे यांनी जेजुरीजवळील नाझरे धरणाच्या परिसरात धालेवाडी येथे जमीन खरेदी केली होती. मात्र या जमिनीवरुन वाद सुरु होते. त्यातच काल ते धालेवाडीत गेले असता पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर पानसरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. स्थानिकांनी त्यांना जेजुरीतील रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला.

पानसरे हे जेजुरी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. तसेच ते व्यावसायिक म्हणूनही प्रसिद्ध होते. जेजुरी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!