पोलिस स्टेशनमध्येच पोलिसकाकावर कुऱ्हाडीनं सपासप वार…

नागपूर : कपिल नगर पोलिस स्टेशनच्या आवारात सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या वाहानचालकावर कुऱ्हाडीने सपासप वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत प्रफुल्ल जगदेवराव धर्माळे हे पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रफुल्ल जगदेवराव धर्माळे यांनी सहाय्यक पोलिस आयुक्तांना पोलिस स्टेशनच्या आवारात सोडल्यानंतर मोटार साफ करत असताना अचानक त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

धर्माळे हे नागपूरच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांचे वाहनचालक आहेत. त्यांनी सहाय्यक आयुक्तांना वाहनातून कपिल नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सोडले. त्यानंतर ते तिथेच गाडी साफ करत असताना अचानक आरोपीने मागून त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यांचे लक्ष नसल्यामुळे दोन घाव बसले. मात्र तिसरा वार प्रफुल्ल यांनी हुकवला, त्यांनी आरडाओरड केल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये असलेले इतर पोलिस त्यांच्या मदतीला धावले. पोलिसांनी आरोपीला जागेवरच पकडले. दिलीप चुनकरे असे आरोपीचे नाव आहे. प्राथमिक चौकशीत त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गोंदियामध्ये मृत पोलिसकाकाच्या कुटुंबियांना धनादेशाचे वाटप…

Video: मुंबईत पोलिसकाकाच्या मुलावर टोळक्याचा हल्ला…

पुणे शहरातील पोलिसकाकाने रेल्वेखाली उडी घेऊन घेतला जगाचा निरोप…

भाजप नेत्याची गाडी अडवल्याची पोलिसकाकाला शिक्षा…

पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!