धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…

अहमदनगर : शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरात घडली आहे. पोलिसांनी राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर या शिक्षकास अटक करून श्रीगोंदा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत सुनावली आहे.

शिक्षकाने आपल्याच शाळेत शिकत आसलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थीनीला शाळेचा अभ्यास असल्याचे सांगून तिच्याशी स्नॅपचॅटवरुन संपर्क केला. शिवाय, अश्लिल बोलू लागला. तिला अर्धनग्न फोटो पाठवण्यासाठी सांगू लागला. हे फोटो त्याच्या हाती लागताच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली होती. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकास अटक केली. श्रीगोंदा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत सुनावली आहे.

दरम्यान, या शिक्षकाकडून सदर पीडितेबाबत हा अत्याचार जानेवारी 2023 ते 14 जून 2023 दरम्यान घडला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!