संतापजनक! पुणे जिल्ह्यात गरिब कुटुंबाच्या झोपड्या पेटवल्या; कसे जगायचे…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे अज्ञात व्यक्तीने दोन झोपड्या पेटवून दिल्यामुळे जळून खाक झाल्या आहेत. आगीमध्ये धान्य, गॅस, गॅस शेगडी व इतर साहित्य व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

खडकवाडी (ता.आंबेगाव) येथील वडदरा वस्ती येथे माऊली डोके यांच्या शेतावर काम करणारे व त्याच्याच जागेत राहाणारे संतोष रामदास पडवळ व बबूशा वामन पडवळ यांच्या दोघांच्या झोपड्या बुधवारी (ता. २४) अंदाजे दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास अज्ञान व्यक्तीने पेटवून दिल्या. यामध्ये दोघांच्याही झोपड्या जळून खाक झाल्या आहे.

संतोष पडवळ व बबूशा पडवळ मूळ पहाडधरा येथील राहाणारे पण कामानिमित्त दोघेही वडदरा वस्ती येथे माऊली डोके यांच्या शेतावर काम करत होते. त्यामुळे त्यांनी त्याच्याच जागेत झोपडया बांधल्या व तेथे ते राहू लागले. दोघेही आपल्या कुटुंबासह तेथे राहात होते. बुधवारी ते शेतात कामाला गेल्यावर दुपारी अज्ञान व्यक्तीने झोपडया पेटवून दिल्याने दोघांच्याही जोपड्या जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये दोघाच्याही झोपडीतील धान्य, गॅस, गॅस शेगडी व इतर साहित्य व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाले. ते शेतात कामाला गेल्यामुळे त्यांच्या जवळ फक्त आता अंगावरील कपडेच शिल्लक राहिली आहेत. आता आम्ही काय करायचे? कसे जगायचे? असा सवाल त्यांनी केला. दोघाचेही प्रत्येकी एक लाख रुपयाचे नूकसान झाले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती समजताच लोणी धामणी येथील तलाठी ऋतूराज ढवळे यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पारगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दतात्रय जठर, पोलिस कॉन्सटेबल संजय साळवे,मं गेश अंभग, राजेंद्र मदने यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांच्याशी संपर्क करून त्याची अग्निशामनाची त्वरीत गाडी बोलवून आग आटोक्यात आणली. घटनेची प्रत्यक्ष पहाणी करून पंचनामा केला. यावेळी पहाडदरा पोलिस पाटील निलेश भालेराव, संतोष कुरकुटे, माजी उपसरपंच विलास पडवळ, माऊली डोके व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. नूकसानग्रस्त दोन्ही पडवळ कुंटूबांना झालेल्या नूकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी खडकवाडीचे ग्रामपंचायत सदस्य गुरुदेव पोखरकर यांनी केली आहे.

पोलिसकाका Video News: २५ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना शुक्रावारी सुट्टी जाहिर…

पुणे शहराला पावसाने झोडपले; डेक्कन भागात पावसाचे तीन बळी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!