
नाशिक! भोंदूबाबाची महिलेली धमकी; माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर…
नाशिक: नाशिक शहरातील इंदिरा नगर परिसरातील एका भोंदूबाबाने तंत्रविद्येच्या माध्यमातून पूजाविधी करत थेट जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवत एका महिलेचे अनेक वर्षे लैंगिक शोषण करून तब्बल 50 लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गणेश जगताप नावाच्या भोंदू बाबा विरोधात इंदिरा नगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.
‘बंगला घेऊन देतो’, ‘फ्लॅट मिळवून देतो’, ‘जमिनीतून सोने काढून देतो’, ‘पैशांचा पाऊस पाडून देतो’, अशा खोट्या आश्वासनांनी फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांकडून सुमारे पन्नास लाख रुपयांची फसवणूक करत भोंदू बाबाने तिचे लैंगिक शोषण केले आहे. या घटनेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या भोंदू बाबाच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. गणेश जगताप हा भोंदू बाबा अद्याप फरार असून इंदिरानगर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. भोंदू बाबाच्या विरोधात याआधी देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक देखील करण्यात आली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या भोंदू बाबाला तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ‘तू मला आवडतेस, तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो’, असे सांगत भोंदू बाबाने महिलेवर दबाव आणल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. पोलिसांना सापडलेल्या एका पुस्तकात महिलेच्या पतीचे आणि मुलांची नाव लिहली होती. तू माझ्यासोबत शरीरसंबंध नाही ठेवलेस तर पुस्तकातील एकाचा बळी जाईल, असे सांगून हा भोंदूबाबा महिलेला धमकावत होता. 2010 पासून आतापर्यंत अनेकदा त्याने महिलेवर शारीरिक अत्याचार केले आहेत.
पुणे शहरात भोंदूबाबाने महिलेला फसवलं; सोन्याच्या हंड्यात निघाली माती…
पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्…
पुणे! भोंदूबाबा निघाला समलैंगिक; पाहा पराक्रम…
भोंदूबाबाने अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसावे लागेल सांगून केले लैंगिक शोषण…
भोंदूबाबा महिलेला काही टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाला अन् खोलीमध्ये गेल्यावर…

