
लातूर! अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध अन् युवकाचा पोलिस ठाण्यातच मृत्यू…
लातूर : एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या युवकाने पोलिस ठाण्यातच आयुष्य संपवल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोमवारी पहाटे चार ते पाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी पोलिसांवर छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणी सीआयडी तपास करण्यात येणार असून, कर्तव्यावरील चार जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
अमित चव्हाण (वय २१) याचे हाडोळती परिसरातील एका अल्पवयीन मुलीसोबत (वय १५) प्रेमसंबंध होते. तो २० नोव्हेंबर रोजी त्या मुलीला घेऊन गेला होता. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून २१ नोव्हेंबर रोजी अमित याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी दोघांना अहिल्यानगर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेऊन किनगाव पोलिस ठाण्यात आणले होते.
View this post on Instagram
सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास त्या अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी अमित पोलिस ठाण्यातच होता. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान त्याने लुंगीसदृश कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, अमितच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली. पोलिसांवर छळाचा आरोप करत आंदोलन केले. या प्रकरणी सीआयडी तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, त्या रात्री कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
पुणे! हिंजवडी IT हबमध्ये प्रेमसंबंधांचा रक्तरंजित शेवट; कारण समोर…
पत्नीचे जीम ट्रेनरसोबत प्रेमसंबंध; पहाटे प्रियकराला घरी बोलवलं अन्..
इंजिनीअर युवतीने रात्रीच्या सुमारास प्रियकराला केला व्हिडिओ कॉल अन्…
प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर संतापाचा कळस! भररस्त्यात नग्न धिंड अन्…
कोल्हापूर! लग्न ठरल्याने प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून; प्रियकराने सांगितले…

